26 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत 83 हजार मतदार बजावणार मतदानाचा हक्क

130 मतदान केंद्रांवर 650 अधिकारी व कर्मचारी करणार काम
26 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत 83 हजार मतदार बजावणार मतदानाचा हक्क

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार श्रीरामपूर तालुक्यातील 27 ग्रामपंचायतींच्या निवडणुका आज 15 जानेवारीला होत असून

सोमवारी दि. 14 रोजी मतदार याद्या जाहीर करण्यात आल्या आहेत. या निवडणुकीत सुमारे 122 मतदान केंद्रांवर 40 हजार 42 स्रिया तर 42 हजार 977 पुरुष असे एकूण 83 हजार 19 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

यासाठी प्रशासन सज्ज झाले असून 26 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी 130 मतदान केेंद्र असून 560 अधिकारी, कर्मचारी यासाठी कार्यरत असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तहसीलदार प्रशांत पाटील यांनी दिली.

श्रीरामपूर तालुक्यातील श्र 15 ग्रामपंचायतींची सदस्य मंडळाची मुदत ऑगस्ट मध्ये संपत आहे. त्यामुळे तालुक्यात 27 ग्रामपंचायतींपैकी एक ग्रामपंचायत बिनविरोध झाल्यामुळे आता निवडणुकीसाठी 26 ग्रामपंचायतींसाठी निवडणूक होत आहे. यासाठी 135 मतदान केंद्र असून 130 बुथ आहेत. त्यात प्रत्येक मतदान केंद्रावर प्रत्येकी 2 अधिकारी,2 कर्मचारी व 1 शिपाई असे पाच जण मतदान कार्यक्रमासाठी कार्यरत राहणार आहेत.

130 मतदान यंत्रे प्रत्येक बुथवर कालच पोहोच करण्यात आले असून सर्व प्रशासकीय तयारी झाली असल्याची माहिती श्री. पाटील यांनी दिली. 26 ग्रामपंचायतीसाठी तालुक्यातुन पुरुष -42,हजार 161 तर स्त्रीया-39,हजार 239 असे मिळून एकूण-81 हजार 400 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यात 577 उमेदवारांचे रायकीय भवितव्य मतपेटीत बंद होणार आहे.

त्यामध्ये बेलापूर- प्रभाग-6 व सदस्य संख्या-17, मतदान केंद्र-15,स्त्री मतदार -6920 पुरुष मतदार-7184 एकूण मतदार-14101 मुठेवडगाव- प्रभाग-3 व सदस्य-9, मतदान केंद्र-3,स्त्री मतदार-916 पुरुष मतदार-1033 एकूण -1949 खानापूर-प्रभाग-3 सदस्य-9,मतदान केंद्र-3, स्त्री मतदार-788 पुरूष मतदार-843 एकूण मतदार-1631 खोकर-प्रभाग -4 सदस्य-11,मतदान केंद्र-4,स्त्री मतदार 1342 पुरुष-1507 एकूण मतदार 2849 वडाळा महादेव प्रभाग-5 व सदस्य-15,स्मतदान केंद्र-6, स्त्री-2181 पुरूष-2372 एकूण 4554 मातापूर-प्रभाग-3 सदस्य-9, मतदान जेंडर-3,स्त्री-908 पुरुष-1024 एकूण 1932 महांकाळवाडगाव-प्रभाग-3, सदस्य-9, मतदान केंद्र-3, स्त्री-816 पुरुष 931 एकूण मतदार 1747 नायगाव-प्रभाग-3, सदस्य-9, मतदान केंद्र-3, स्त्री-707 पुरूष-789 एकूण 1496 टाकळीभान-प्रभाग-6 सदस्य-17, मतदान केंद्र-11, स्त्री-3808 पुरुष-4034 एकूण-7842 भेर्डापूर-प्रभाग-4, सदस्य-11, मतदान केंद्र-4, स्त्री-1427 पुरुष-1506 एकूण 2933 वळदगाव-प्रभाग-3 सदस्य-9, स्त्री-689 मतदान केंद्र-3, पुरुष-778 एकूण-1467 मालुंजा बु -प्रभाग-4 सदस्य-11, मतदान केंद्र-4,स्त्री-1426 पुरुष-1443 एकूण 2869 गळनिंब-प्रभाग-3 सदस्य-9, मतदान केंद्र-3, स्त्री-1019 पुरुष-1092 एकूण 2111 बेलापुर खुर्द-प्रभाग-5 सदस्य-13,मतदान केंद्र-5,स्त्री-1928 पुरुष-2170 एकूण-4098 पढेगाव-प्रभाग-5 मतदान केंद्र-5,सदस्य-15 स्त्री-2799 पुरुष-2971 एकूण-5776 मातुलठाण-प्रभाग-3 सदस्य-7, मतदान केंद्र-3,स्त्री-531 पुरुष-574 एकूण-1105 घुमनदेव-प्रभाग-3 सदस्य-7,मतदान केंद्र-3, स्त्री-436 पुरुष-461 एकूण-897 गोंडेगाव-प्रभाग-4 सदस्य-11, मतदान केंद्र-4, स्त्री-1587 पुरुष -1712 एकूण 3299 कारेगाव-प्रभाग-5,सदस्य-11, मतदान केंद्र-5,स्त्री-2199 पुरुष-2263 एकूण-4462 निपाणी वाडगाव-प्रभाग-6 सदस्य-17,मतदान केंद्र-10, स्त्री-3812 पुरुष-4245 एकूण-8057 सराला प्रभाग-3 सदस्य-7, मतदान केंद्र-3,स्त्री-477 पुरुष-527 एकूण-1004 गोवर्धनपूर-प्रभाग-3 सदस्य-7, मतदान केंद्र-3, स्त्री-361 पुरुष-369 एकूण-730 एकलहरे-प्रभाग-3 सदस्य-9,मतदान केंद्र-3, स्त्री-836 पुरुष-851 एकूण-1687 लाडगाव-प्रभाग-3 सदस्य-7, मतदान केंद्र-3, स्त्री-473,पुरुष-518 एकूण-991 कुरणपूर-प्रभाग-3 सदस्य-7,मतदान केंद्र-3,स्त्री-528 पुरुष-590 एकूण-1118 ब्राम्हणगाव वेताळ-प्रभाग-3 सदस्य-7,मतदान केंद्र-3,स्त्री-521 पुरुष-559 एकूण-1080 मांडवे-प्रभाग-3 सदस्य-9 मतदान केंद्र-3 स्त्री-607 व पुरुष-630 एकूण 1237 मतदार आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com