गोंधवणी परिसरातील गावठी दारुअड्डे पोलिसांनी केले उद्ध्वस्त

सव्व दोन लाखांचा मुद्देमाल जप्त, पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल
गोंधवणी परिसरातील गावठी दारुअड्डे पोलिसांनी केले उद्ध्वस्त

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

शहरातील गोंधवणी (Godhavni) परिसरात असलेल्या गावठी दारू अड्ड्यांवर छापा (Raids on Liquor Dens) टाकून पोलिसांनी (Police) 2 हजार 800 लिटर गावठी हातभट्टी दारू (Liquor) तयार करण्याचे कच्चे रसायन तसेच 140 लिटर गावठी हातभट्टी दारू (Gavathi Liquor) व इतर साहित्य असा 2 लाख 13 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त (Seized) करत दारू अड्डे उद्ध्वस्त केले. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात (City Police Station) 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके (Deputy Superintendent of Police Sandeep Mitke) यांच्यासह पथकाने ही कारवाई केली. भल्या पहाटे व अचानक केलेल्या या कारवाईमुळे श्रीरामपूर (Shrirampur) शहरातील अवैध धंदे (Illegal trades) चालकांचे धाबे दणाणले आहेत.

श्रीरामपूर (Shrirampur) शहरातील गोंधवणी (Gondhavani) येथे गावठी हातभट्टी दारू अड्डे व हातभट्टी दारू तयार करत असल्याची गुप्त व खात्रीशीर माहिती पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके (Deputy Superintendent of Police Sandeep Mitke) यांना मिळाल्याने त्यांनी आपल्या पथकातील अधिकारी व अंमलदार यांना याठिकाणी छापा टाकण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी गोंधवणी परिसरातील सर्व गावठी हातभट्टी दारू अड्ड्यांवर छापा टाकून गावठी हातभट्टी दारू तयार करण्याचे कच्चे रसायन, तयार गावठी हातभट्टी दारू यांचा नाश केला.

यावेळी पोलिसांनी गोंधवणी येथील अशोक काशिनाथ शिंदे याचेकडून 42,000 रु. किमतीचे 600 लिटर गावठी हातभट्टी दारू तयार करण्याचे कच्चे रसायन व 250 रू. किमतीची 25 लिटर तयार गावठी हातभट्टी दारू, अशोक सिताराम गायकवाड याचेकडून 45,500 रु. किमतीचे 650 लिटर गावठी हातभट्टी दारू तयार करण्याचे कच्चे रसायन व 3000 रु. किमतीची 30 लिटर तयार गावठी हातभट्टी दारू, राजेंद्र फुलारे याचेकडून 42,000 रु. किमतीचे 600 लिटर गावठी हातभट्टी दारू तयार करण्याचे कच्चे रसायन व 3000 रू. किमतीची 30 लिटर तयार गावठी हातभट्टी दारू, दिलीप नाना फुलारे याचेकडून 28,000 रु. किमतीचे 400 लिटर गावठी हातभट्टी दारू तयार करण्याचे कच्चे रसायन व 2000 रु. किमतीची 20 लिटर तयार गावठी हातभट्टी दारू आणि सुरेश फुलारे याचेकडून 42,000 रु. किमतीचे 600 लिटर गावठी हातभट्टी दारू तयार करण्याचे कच्चे रसायन व 3500 रु. किमतीची 35 लिटर तयार गावठी हातभट्टी दारू असा एकूण 2 लाख 13 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

या पाच जणांविरुद्ध श्रीरामपूर शहर (Shrirampur City) पोलीस स्टेशनमध्ये. गु. र. नं. खखख, 568, 569, 570, 571, 572, मुंबई दारूबंदी कायदा कलम 65 ( फ) (क) (ड ) (ई) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अपर पोलीस अधीक्षक डॉ. दिपाली काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके, पोलीस सब इन्स्पेेक्टर ऊजे, राजेंद्र आरोळे, सुरेश औटी, पोलीस कॉन्स्टेबल नितीन शिरसाठ, श्याम बनकर, आदिनाथ चेमटे, प्रदीप गर्जे, सलमान कादरी, गौतम दिवेकर व आरसीपी पथकाने ही कारवाई केली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com