श्रीरामपुरात गावठी कट्टा बाळगणार्‍या एकास अटक

श्रीरामपुरात गावठी कट्टा बाळगणार्‍या एकास अटक

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

येथील वॉर्ड नं. 7, पटेल हायस्कूलसमोर एका जणाकडे गावठी कट्टा व एक जिवंत काडतुस आढळून आल्याने पोलिसांनी त्यास अटक केली आहे.

याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात आर्म अ‍ॅक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

श्रीरामपुर पोलीस स्टेशनला नव्यानेच आलेले पोलीस निरीक्षक संजय सानप यांना कामकाजाच्या दुसर्‍या दिवशी एका जणाकडे एक गावठी कट्टा व एक जिवंत काडतुस असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलीस निरीक्षक संजय सानप यांनी अप्पर पोलीस अधिक्षक डॉ. दिपाली काळे, उपविभागीय अधिकारी संदिपं मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय सानप, सहाय्यक पोलीस निरीक्षक संभाजी पाटील पोलीस नाईक, गणेश भिंगारदे पोलीस काँन्स्टेबल राहुल नरोडे यांनी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे शोध घेतला असतात्यांना गुप्त बातमीदारा मार्फत माहीती मिळाली की वॉर्ड नंबर सात पूर्णवाद नगर येथील आरोपी निरज वैद्य हा गावठी कट्टा विक्रीच्या उद्देशाने घेऊन फिरत आहे.

उपविभागीय अधिकारी संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली पो. नि. सानप ,पी. आय. संभाजी पाटील, पोलीस नाईक गणेश भिंगारदे, पोलीस कॉन्स्टेबल राहुल नरोडे यांनी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे शोध घेतला असता निरज वैद्य हा संशयास्पद फिरताना आढळून आला. त्याची अंग झडती घेतली असता त्याचा कमरेला एक गावठी कट्टा व एक जिवंत काडतुस आढळून आले असून संबंधीताविरुध्द आर्म अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात पोलीस कॉन्स्टेबल गौरव नंदकिशोर दुरगुडे यांनी फिर्याद दाखल केली असून पोलिसांनी निरज नंदकुमार वैद्य याचेविरुध्द गुन्हा रजि. नं. 43/2021प्रमाणे भा. दं. वि. प्रमाणे आर्म अ‍ॅक्ट 3, 25 अन्वये प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस निरीक्षक संजय सानप यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस करत आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com