श्रीरामपुरात कट्ट्यासह तरूणास अटक

शिर्डी, कोपरगाव, नगरमध्येही गुन्हे
श्रीरामपुरात कट्ट्यासह तरूणास अटक

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

शहरातील हुसेन नगर, जगताप मळा, वॉर्ड नंबर 1, या ठिकाणी अ‍ॅक्टीवा गाडीच्या सीटखाली असलेल्या डिक्कीमध्ये एक गावठी कट्टा व एक जिवंत काडतुस असा 65,000/- रुपयाचा ऐवज पोलिसांनी हस्तगत करुन एका तरूणास अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात आर्म अ‍ॅक्ट अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

श्रीरामपूर शहर पोलिसांना जबरी चोरी करण्याचे उद्देशाने हुसैननगरकडून खबडीकडे जाणार्‍या रस्त्यावर एकजण अ‍ॅक्टीवा मोटारसायकलवर फिरत आहे, अशी गोपनीय बातमी मिळाल्यावरुन नगर जिल्हा पोलीस अधिक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधिक्षक डॉ. दीपाली काळे, पोलीस उपअधिक्षक संदीप मिटके यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय सानप, पोहेकॉ जोसेफ साळवी, पोकॉ किशोर जाधव, पोकॉ राहुल नरवडे, पोका पंकज गोसावी, पोकॉ राहुल गायकवाड, पोना करमल, पोकॉ सुनील दिघे यांचे पथकाने त्याचा पाठलाग करुन बळीराम उर्फ बल्ली यादव (वय 30) रा. सरस्वती कॉलनी ,वॉर्ड नंबर 7, श्रीरामपूर हा रुपये 25000 च्या गावठी कट्ट्यासह शिताफीने पकडले. सदर आरोपीची अंगझडती व अ‍ॅक्टीवा गाडीची झडती घेतली असता अ‍ॅक्टीवा गाडीच्या सीटखाली असलेल्या डिक्कीमध्ये एक गावठी कटटा व एक जिवंत काडतुस असा 65,000/- रुपयाचा मुद्देमाल मिळुन आला आहे.

याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात पोलीस हेड कॉन्स्टेबल किशोर जाधव यांनी फिर्याद दाखल केली असून पोलिसांनी गु.र.नं. 248/2021 आर्म अ‍ॅक्ट 3, 5, 7/25 या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com