श्रीरामपुरात गावठी कट्ट्यासह एकास अटक

श्रीरामपुरात गावठी कट्ट्यासह एकास अटक

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

श्रीरामपूर शहरातील वॉर्ड नं. 2, पापा जलाल रोड या ठिकाणी एक गावठी कट्टा व एक जिवंत काडतूस बेकायदेशिरित्या बाळगताना साजिद उर्फ मुनचून खालीद मलीक (वय 24) यास पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात आर्म अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस उपमहानिरीक्षक, नाशिक परिक्षेत्र, नाशिक व पोलीस अधीक्षक अहमदनगर यांचे आदेशाने अहमदनगर जिल्ह्यामध्ये अवैध अग्निशस्त्र शोध मोहिम राबविण्यात येत असून त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पथक श्रीरामपूर शहर व तालुका परिसरामध्ये अवैध अग्निशस्त्रांची गोपनिय माहिती घेत असताना दि. 29 सप्टेंबर 2021 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना गुप्त खबर्‍याकडून माहिती मिळाली, साजिद उर्फ मुनचून खालीद मलीक हा श्रीरामपूर येथे वार्ड नं. 2 परिसरात गावठी कट्टा बेकायदेशिररित्या कब्जात बाळगून फिरत आहे.

त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ दिवटे, पोलीस हेड कॉन्स्टेबल मनोहर गोसावी, सुनील चव्हाण, दत्तात्रय हिंगडे, पोलीस कॉन्स्टेबल रणजित जाधव, सागर ससाणे अशांनी मिळून दोन पंचासह खाजगी वाहनाने बेलापूर पोलीस दुरक्षेत्र येथून निघून वार्ड नं. 2, श्रीरामपूर येथे जाऊन मिळालेल्या बातमीनुसार पापा जलाल रोड, वार्ड नं. 2 येथे सापळा लावला. त्यानंतर काही वेळातच आरोपी पापा जलाल रोड येथे संशयितरित्या फिरताना दिसला. पोलीस पथकाने घेराव घालून त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता अंगझडतीमध्ये एक गावठी बनावटीचा कट्टा (पिस्टल) व एक जिवंत काडतूस (एकूण किमत 30,500 रुपये) जप्त करण्यात आलेला आहे.

याप्रकरणी पोलीस हेड कॉन्स्टेबल मनोहर गोसावी यांनी श्रीरामपूर शहर पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरुन गुरनं. ॥ 683 / 2021, भारतीय हत्यार कायदा कलम 3/25 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Stories

No stories found.