श्रीरामपूर शहर व तालुक्यात बाप्पाचे उत्साहात स्वागत

तालुक्यात चार गावांमध्ये एक गाव एक गणपती श्रीरामपुरात 86 गणेशोत्सव मंडळांना परवानगी
श्रीरामपूर शहर व तालुक्यात बाप्पाचे उत्साहात स्वागत

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

श्रीरामपूर शहर व तालुक्यात बाप्पाचे ढोल ताशाच्या गजरात आणि गणपती बाप्पाच्या जयघोषाने जल्लोषात स्वागत करण्यात आले. तालुक्यातील चार गावांमध्ये एक गाव एक गणपती उपक्रम राबविण्यात आला आहे. तर श्रीरामपूर शहरात 86 गणेशोत्सव मंडळांना गणेशोत्सव साजरा करण्याची परवानगी देण्यात आली आहे. गणेशोत्सवाच्या या दहा दिवसांच्या कालावधीत विविध सांस्कृतिक व सामाजिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.

करोनाच्या उद्रेकामुळे गेली दोन वर्षे गणेशोत्सव कार्यक्रम बंद ठेवण्यात आले होते. त्यामुळे यावर्षी मोठ्या प्रमाणावर गणेशोत्सव साजरा करण्याचे तरुण मंडळांनी ठरविल्यामुळे गल्ली बोळातील लहान -मोठ्या तरुण मंडळांनी गणेशोत्सव साजरा करण्यात लगबग दाखविली. त्यामुळे गल्ली-गल्लीत दहा दिवस गणेशाची गाणी व गणपती बाप्पांचा जयघोष ऐकायला मिळणार आहे. श्रीरामपूर शहर व तालुक्यातील घरोघरीही गणेशभक्तांनी गणेशाची स्थापना करून गणेशोत्सव साजरा करत आहेत.

श्रीरामपूर तालुक्यातील वळदगाव, खंडाळा, ब्राम्हणगाव भांड व दिघी या चार गावांमध्ये एक गाव एक गणपती हा उपक्रम राबविण्यात आला आहे. या चारही गावांत दहा दिवस सगळ्यांनी एकत्र येऊन विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. यामुळे गावातील एकोपा हा कायम दिसून येत असल्यामुळे गावात गणेशमय वातावरण तयार झाले आहे.

श्रीरामपूर शहरात 86 गणेशोत्सव मंडळांना परवानगी देण्यात आली असून यामध्ये मेनरोडरील श्रीराम मंदिर चौक मित्रमंडळ, शंभुराजे मित्रमंडळ, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ बेलापूर रोड मित्रमंडळ, शिवाजी रोडवरील छत्रपती शिवाजी महाराज रोडचा राजा मित्रमंडळ, सावता रोड मित्रमंडळ, नगरपरिषद, प्रभात दूध डेअरी, अशोक दूध, अशोक कारखाना, नेवासा रोड मित्रमंडळ, बाजार समिती, लक्ष्मी पिक्चर पॅलेस, यासह तालुक्यातील विविध गणेश मंडळांचा सहभाग आहे. श्रीरामपूर शहरात विविध सार्वजनिक, धार्मिक व सामाजिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com