श्रीरामपुरात विनाकारण फिरणार्‍यांची प्रशासनाकडून करोना चाचणी

श्रीरामपुरात विनाकारण फिरणार्‍यांची 
प्रशासनाकडून करोना चाचणी

श्रीरामपूर (प्रतिनिधी) - करोना साखळी तोडण्यासाठी प्रशासनाकडून विनाकारण घराबाहेर फिरणार्‍या नागरिकांची जागेवरच करोना चाचणी करून त्यांना कोविड सेंटरमध्ये दाखल करण्याची अथवा दंडात्मक कारवाईची मोहिम हाती घेण्यात आली आहे. आज अचानक सूरू करण्यात आलेल्या या कारवाईमुळे अनेकांची त्रेधातीरपीट उडाली.

श्रीरामपूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात काल सकाळपासूनच पोलीस व प्रशासनाने रस्त्यावर ऊभे राहून वाहनांची तपासणी केली. यावेळी विनाकारण फिरणार्‍या नागरिकांची जागेवर करोना चाचणी करण्यास सुरुवात केलीे.

या चाचणी दरम्यान कोणी करोना पॉझिटिव आढळल्यास संबंधीत नागरिकाला थेट कोवीड सेंटरमध्ये भरती करण्यात येत असून करोना निगेटिव आल्यास प्रशासनाकडून दंडात्मक कारवाई केली जात आहे. प्रशासनाच्या या कारवाईमुळे सकाळी छत्रपती शिवाजी चौकातून येणार्‍या-जाणार्‍या नागरिकांची चांगलीच धांदल उडाल्याचे पाहावयास मिळाले.

दोन दिवसापूर्वी श्रीरामपूर शहरात करोना रुग्णसंख्येने अचानक मोठी झेप घेतली होती. सरासरी 200 च्या आसपास असणारा रुग्ण संख्येचा आकडा दोन दिवसापूर्वी चारशेच्या जवळपास गेला होता.

त्यामुळे प्रशासनाने ही कारवाई सुरू केल्याचे बोलले जात आहे. करोना साखळी तोडण्यासाठी प्रशासनाकडून आता विनाकारण घराबाहेर फिरणार्‍या नागरिकांची जागेवर करोना चाचणी करून कोविड सेंटरमध्ये दाखल अथवा दंडात्मक करण्याची कारवाई मोहिम हाती घेण्यात आली आहे. नागरिकांनी विनाकारण बाहेर फिरू नये, श्रीरामपूरकरांनी याबाबत खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com