
श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur
बोंबलेनगर, वॉर्ड नं. 7, श्रीरामपुरातील बेलापुर कमानीजवळ जागरण गोंधळादरम्यान झालेल्या वादाचे कारणावरुन पहाटेच्या दरम्यान एका जवळ असलेल्या छर्यांचे गावठी कट्ट्यासारख्या हत्यारातुन जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने गोळीबार करुन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बोंबलेनगर, वॉर्ड नं. 7, श्रीरामपुरातील बेलापुर कमानीजवळ संतोष एकनाथ वायकर (वय 30) हा राहत असून शुक्रवार दि. 10 मार्च रोजी त्याच्या घराच्या मागे असलेल्या भाऊसाहेब गंगावणे यांचे घरी जागरण गोंधळाचा कार्यक्रम होता. या ठिकाणी माझे शेजारी राहणारे माझे नातेवाईक विष्णु रामदास लाड याने माझे सोबत कोतवाली पोलिसांना तु माझी खबर दिली, त्यामुळे माझ्यावर गुन्हा पडला असे सांगुन माझेशी भांडण काढुन मला मारहाण केली.
त्यानंतर मी घरी गेलो असता, तेथे पुन्हा विष्णु रामदास लाड, त्याची पत्नी राणी विष्णु लाड, त्याचा भाऊ शंकर रामदास लाड व त्याचा साडु गणेश नामदेव बिरदवडे असे आले व त्यांनी मला व माझे आईला शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी मारले. म्हणुन माझी आई मंजु एकनाथ वायकर हिने श्रीरामपुर शहर पोलीस स्टेशन येथे जावुन त्यांचे विरुद्ध तक्रार दिली आहे. त्यानंतर उपचारकामी माझी आई कामगार हॉस्पिटल, श्रीरामपुर येथे अॅडमिट आहे.
सकाळी 8.30 वा. चे सुमारास संतोषने त्याचे आईला कामगार हॉस्पिटल येथे भेटण्यासाठी चाललो असता शंकरने त्याचे घराचे पुढील गेट उघडले असता, तेथे विष्णु लाड हा त्यांचे घराचे समोर मोटरसायकल जवळ उभा दिसला.संतोषने माझे कारमध्ये बसुन गाडी गेटमधुन बाहेर काढुन डावीकडे बेलापुर कमानीचे दिशेने वळविली असता, लागलीच समोरुन विष्णु लाड याने लय माजला का? आज तुझा मर्डरच करतो असे ओरडुन विष्णूने त्याचे हातातील छर्याचे गावठी कट्ट्यासारख्या हत्यारातुन संतोषला जीवे ठार मारण्याचे उद्देशाने त्याच्या दिशेने फायर करुन त्याला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला.
त्यामध्ये त्याच्या गाडीची पुढील काचेच्या विंडशिल्डवर खड्डा पडुन काचेला तडे गेले तसेच गाडीत व बोनेटवर काचेचे तुकडे पडले. विष्णु लाड हा मोटरसायकल बसुन बेलापुर कमानीचे दिशेने निघुन गेला. सदर प्रकाराने मी अत्यंत घाबरलो व गाडी जागीच सोडुन घरात पळुन आलो व मदतीसाठी पोलिसांना फोन करुन बोलावुन घेतले. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बोंबलेनगर, वॉर्ड नं. 7, श्रीरामपुरातील बेलापुर कमानीजवळ काल घटना घडली पहाटे रात्री आठ वाजेपर्यंत पोलीस स्टेशनला नोंदच नाही, असे ठाणे अंमलदार सांगतात. पोलीस उपअधिक्षक श्री.मिटके यांना विचारले असता गुन्हा दाखल आहे घेवून टाका ! तरीही कर्मचार्यांनी ती माहिती देण्यास टाळाटाळ केली. त्यानंतर पोलीस निरीक्षक श्री. गवळी आले असता त्यांना विचारले असता दाखल असेल, ठाणे अंमलदार म्हणातात अजून नाही! मग नसेल दाखल असे मोघम उत्तम एक पोलीस स्टेशनचा जबाबदार अधिकारी एक़ा प्रसारमाध्यमाच्या प्रतिनिधींना देत असेल तर याला काल म्हणावे. ही तर गुन्हे दडपण्याची, बाहेर कोणाला माहित होवू न देणे यामागे नक्की काय असावे? याबाबत वरिष्ठांनी लक्ष घालावे अशी मागणी होत आहे. गुन्हा काय घडला असे विचारले असता या पोलीस ठाण्यातून माहिती दिली जात नाही. मात्र एखादा गुन्हा उघडकीस केला तर पाच पंचवीस नागरिक, दहा ते बारा पोलीस आठ ते दहा प्रसारमाध्यमांच्या लोकांना बोलावून ती जग जाहीर केली जाते. मग गुन्हा घडल्याची माहिती दडपण्याच कारण काय?