श्रीरामपूरच्या मुख्याध्यापकासह कोर्‍हाळ्याच्या दोघांवर गुन्हा; हे आहे कारण

श्रीरामपूरच्या मुख्याध्यापकासह कोर्‍हाळ्याच्या दोघांवर गुन्हा; हे आहे कारण

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

शासनाच्या शासन आपल्या दारी या उपक्रमाअंतर्गत विवाह नोंदणीचे प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचे दाखले, जातीचे प्रमाणपत्र घरपोहोच काढून आणून देतो, असे म्हणत गोरगरीब जनतेकडून पैसे उकळून त्यांना बनावट दाखले देत असताना दोन जणांना रंगेहात पकडण्यात आले. सदर घटना तालुक्यातील जाफराबाद येथे घडली. याप्रकरणी श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात तीन जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील आरोपी सोपान सखाराम उमाप जिल्हा परिषदेचा निवृत्त मुख्याध्यापक आहे.

काल सकाळी 10 वाजेच्या सुमारास तालुक्यातील जाफराबाद येथे ग्रामपंचायत शेजारी दोन इसम हे बॅगेसह आले असून ते गावातील काही लोकांना विवाह नोंदणीचे प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखले, जातीचे प्रमाणपत्र देत आहेत. असा श्री. तेलतुंबडे यांना नायब तहसिलदार श्री. वाघचौरे यांचा फोन आला. त्यावर श्री. तेलतुंबडे यांनी जाफराबाद येथे जावून पाहिले असता ते दोन इसम हे शासन आपल्या दारी हा शासनाचा उपक्रम चालु असून त्यासाठी गरजुंना विवाह नोंदणीचे प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखले, जातीचे प्रमाणपत्र घरपोहोच काढून आणुन देत आहोत असं म्हणत होते.

तेलतुंबडे यांनी त्यांना त्यांचे नाव विचारले असता त्यांनी विष्णु नारायण शिंदे, रवींद्र शंकर आरणे (रा- कोर्‍हाळे, ता-राहाता) असे सांगितले. त्यांनी त्यांच्याकडील विवाह नोंदणीचे प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखले, जातीचे प्रमाणपत्र असे अनेक कागदपत्र पाहिले असता त्यात निबंधक, ग्रामपंचायत शिंगणापुर, ता- कोपरगाव यांनी दिलेले बरेच विवाह प्रमाणपत्र तसेच जिल्हा प्राथमिक शाळा नांदूरचे मुख्याध्यापक यांनी दिलेले अनेक शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र तसेच सब डिव्हीजनल ऑफीसर श्रीरामपूर यांनी 2017 मध्ये दिलेले वेगवेगळ्या जातीचे दाखले आढळून आले. अशा प्रकारे दाखले देण्याचा शासनाचा कोणताही उपक्रम चालू नसल्याने श्री. तेलतुंबडे यांना सदर इसमाकडे असलेले कागदपत्र बनावट असल्याचा संशय आल्याने सदर करागदपत्रासह वरील दोन्ही इसमांना गावातील लोकांच्या मदतीने सब डिव्हीजनल ऑफीस श्रीरामपुूर येथे आणले.

त्या दोन्ही इसमाकडे असलेले जातीचे दाखले सदर कार्यलयातून दिले कसे? याची खात्री कार्यालयात केली असता त्या दोन्ही इसमांकडील दाखले हे बनावट असल्याचे आढळून आले. याबाबत त्यांच्याकडे चौकशी केली असता बनावटी कागपत्र हे त्यांच्या ओळखीचे इसम सोपान सखाराम उमाप (रा-एकलहरे, ता-श्रीरामपूर) यांच्याकडून बनवून आणतो आणि लोकांकडून प्रति प्रमाणपत्र 1500 रुपयाप्रमाणे आणुन देतो. त्यामधील सोपान उमाप यांना एक हजार रुपये व 500 रापये आम्हा दोघांत वाटून घेतात असे त्यांनी सांगितले.

म्हणून त्यांना प्रांताधिकारी व तहसिलदार यांच्या आदेशानुसार तालुका पोलीस ठाणे येथे नेवून त्यांच्यावर तलाठी अविनाश तेलतुंबडे यांच्या फिर्यादीवरुन विष्णु नारायण शिंदे, रवींद्र शंकर आरणे (रा- कोर्‍हाळे, ता-राहाता), सोपान सखाराम उमाप (वय 78, रा-एकलहरे) यांच्याविरुध्द भादंवि कलम 420, 465, 468, 471, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यापैकी दोन जणांना पोलिसांनी अटक केली आहे. पुढील तपास तालुका पोलीस करत आहे. या सर्व कामी जाफराबदचे सरपंच संदीप शेलार व जाफराबद ग्रामस्थ यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

विवाह नोंदणीचे प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखले, जातीचे प्रमाणपत्र असे अनेक कागदपत्र पाहिले असता त्यात निबंधक, ग्रामपंचायत शिंगणापुर, ता- कोपरगाव यांनी दिलेले बरेच विवाह प्रमाणपत्र तसेच जिल्हा प्राथमिक शाळा नांदूरचे मुख्याध्यापक यांनी दिलेले अनेक शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र तसेच सब डिव्हीजनल ऑफीसर श्रीरामपूर यांनी 2017 मध्ये दिलेले वेगवेगळ्या जातीचे दाखले आढळून आले.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com