श्रीरामपूर शहरात दुसर्‍या दिवशीही अतिक्रमण मोहीम सुरुच

श्रीरामपूर शहरात दुसर्‍या दिवशीही अतिक्रमण मोहीम सुरुच

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

श्रीरामपूर नगरपालिका व पोलीस प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने काल दुसर्‍या दिवशीही अतिक्रमण मोहीम सुरुच ठेवली आहे. काल सय्यद बाबा चौक पासून गोंधवणी रोडचे अतिक्रमण काढण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे नागरिकांनी अतिकमण काढतांना सहकार्य करावे असे आवाहन मुख्याधिकारी गणेश शिंदे यांनी केले.

परवाच्या दिवशी मेनरोड व शिवाजीरोडवरील अतिक्रमण मोहीम काढण्यात आली. यात अद्यापही काही ठिकाणी अतिक्रमणे तशीच सोडण्यात आली आहेत. त्यामुळे अतिक्रमण काढताना कोणताही भेदभाव न करता अतिक्रमणे काढावीत, अशी मागणी व्यावसायिकांनी केली आहे. पालिका व पोलीस प्रशासनाने काल गोंधवणी रोडवरील सय्यद बाबा चौकापासून अतिक्रमण काढण्याची मोहीम सुरु केली.

यात श्रीरामपूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी गणेश शिंदे व अतिकमण अअधिकारी संजय शेळके यांच्यासह कर्मचारी स्वतः रस्त्त्यावर उतरुन अतिक्रमण काढले जात आहे. यावेळी पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी, सहाय्यक पोलीस निरीक्षक विठ्ठल पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन बोरसे, पोलीस उपनिरीक्षक समाधान सुरुवाडे, पोलीस उपनिरीक्षक श्रीमती निकम व त्यांचे पोलीस कर्मचारी अतिक्रमण काढत आहेत.

अतिक्रमण काढताना व्यावसायिकांनी व नागरिकांनी आपली जागा अतिक्रमीत असेल तर त्यांनी स्वतःहून अतिक्रमण काढून घ्यावे, असे आवाहन करण्यात आले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com