
श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur
हरेगाव ग्रामपंचायत हद्दीतील आठवडे बाजारचे तार कपाऊंडचे काम बी 1 टेंडर काढून पंधरा व्या वित्त आयोगाची कामे आपल्या मर्जीतील ठेकेदारास दिले. सदर काम हे बेकायदा स्वरुपाचे असून त्यास स्थगिती देऊन ई टेंडर पध्दतीने काम देण्यात यावे, अशी मागणी माजी सदस्य अशोक हिवाळे यांनी केली आहे.
दि. 30 ऑगस्ट 2021च्या ग्रामसभेत दि कॉर्टर ग्रामस्थ राहत असलेल्या घराचे दुरुस्ती करण्याचा ठराव एकामताने मंजूर होऊनही अद्याप त्यासंदर्भात ठोस कारवाई झालेली नाही. याबाबत पंचायत समिती श्रीरामपूर यांचेकडे ग्रामस्थांनी लेखी निवेदन देऊन कारवाईची मागणी केली असता संबंधित अधिकार्याकडून उडवाउडवीचे उत्तर दिले जात आहे, असेही हिवाळे यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
चौदा वित्त आयोगाचे 2020-21 या वर्षात सरासरी 50 लाख रुपये निधी आला होता. परंतु सदरील निधी दलित वस्ती विकासासाठी न वापरता इतर वॉर्डात वापरण्यात आला आहे, असा आरोप करून 15 व्या वित्त आयोगाचा निधी डि क्वार्टर दलित वस्तीमध्ये वापरण्यात यावा, अशी मागणी अशोक हिवाळे यांच्यासह ग्रामस्थांनी केली आहे.