श्रीरामपुरातील सराईत गुन्हेगारास नाशिक पोलिसांनी केले जेरबंद

दहा सोनसाखळी चोरींची उकल; मोका व खुनाच्या आरोपात पाच वर्षांपासून पसार
श्रीरामपुरातील सराईत गुन्हेगारास नाशिक पोलिसांनी केले जेरबंद
जेरबंद

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

खून आणि मोक्काच्या कारवाईत गेल्या पाच वर्षांपासून श्रीरामपूर पोलिसांच्या हातावर तुरी देत पसार असलेला

नईम मेहमूद सय्यद (वय 30) या कुख्यात बेग टोळीतील सराईत गुन्हेगारास शहर पोलिसांनी जेरबंद केले आहे. श्रीरामपूरहून नाशिकला येऊन अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना सोनसाखळ्या ओरबाडण्याचे प्रशिक्षण देण्याच्या प्रयत्नात तो पकडला गेला. या सराईत गुन्हेगाराकडून पोलिसांनी नाशिक शहरातील 11 सोनसाखळ्या चोरीच्या घटनांतील 154 ग्रॅम सोन्याचा ऐवज हस्तगत कला आहे.

श्रीरामपूर येथील जुन्या तहसील कचेरीच्या मागे राहत असलेला नईम सय्यद (वय 30)या सराईत गुन्हेगाराकडून दहा सोनसाखळीच्या गुन्ह्यांची उकल झाल्याची माहिती पोलीस उपायुक्त संजय बारकुंड यांनी दिली. ते म्हणाले, की नाशिक रोडला पकडलेल्या कपिल कृष्णा जेधे व गणेश रामदास बन या दोन संशयितांकडून सराईत नईम सय्यद व ट्रीपल एक्स ऊर्फ रॉकी यांची नावे निष्पन्न झाली. गुन्हे शाखा एकच्या पथकाने त्यांचा पुण्यात तपास सुरू केला असता, माग काढीत श्रीरामपूर येथे पोहचले. या ठिकाणी दोन दिवस पाळत ठेवून, अखेरीस सिनेस्टाईल पाठलाग करून पोलिसांनी नईम सय्यद यास जेरबंद केले.

त्याची कसून चौकशी केली असता, त्याने दिलेल्या कबुलीप्रमाणे शहरातील दहा सोनसाखळ्या चोरीच्या गुन्ह्यांची उकल झाली आहे. त्याच्याकडून 7 लाख 8 हजार 400 रुपयांचे 145 ग्रॅम सोने जप्त करण्यात आले आहे. तसेच चोरीची एक दुचाकी, असा एकूण सात लाख 48 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सहाय्यक आयुक्त मोहन ठाकूर, गुन्हे शाखेचे वरिष्ठ निरीक्षक आनंदा वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक महेश कुलकर्णी, रवींद्र बागूल, रघुनाथ शेगर, कर्मचारी संजय मुळक, आसिफ तांबोळी, दिलीप मोंढे, फय्याज सय्यद, विशाल काठे, विशाल देवरे, राहुल पालखेडे, गणेश वडजे, प्रवीण चव्हाण यांनी ही कामगिरी पार पाडली.

खून आणि मोक्का सराईत नईम हा पाच वर्षांपासून खुनाच्या गुन्ह्यातील पसार आहे. श्रीरामपूर पोलीस त्याला शोधत होते. नाशिक रोडला चेहेडी शिवारात पंपिंग परिसरात पिठाच्या गिरणीतून रात्री साडेआठला घरी चाललेल्या महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी ओरबाडण्याच्या प्रयत्नात दोनपैकी एका दुचाकीवरील चोरटे दुचाकी घसरून पडले होते.

म्हसरूळ- तीन, नाशिक रोड, दोन, भद्रकाली एक, अंबड एक, उपनगर- एक, देवळाली कॅम्प- एक, पंचवटी, एक, लोणी- एक अशा दहा गुन्ह्यांचा तपास लागला.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com