घरफोडीच्या गुन्ह्यातील सराईत दोघे आरोपी मुद्देमालासह जेरबंद

घरफोडीच्या गुन्ह्यातील सराईत दोघे आरोपी मुद्देमालासह जेरबंद

श्रीरामपूर (प्रतिनिधी)

शहरातील वॉर्ड नं. 2 मधील राहत्या घराची खिडकीच्या आतील कडी तोडून घरात प्रवेश मिळवून 1 लाख 68 हजाराचा ऐवज चोरुन नेणार्‍या दोघा सराईत आरोपींना श्रीरामपूर शहर पोलिसांनी जेरबंद केले. पोलिसांनी त्यांच्याकडून 65 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.

श्रीरामपूर शहरातील वार्ड नं 02 रोशनी जावेद कच्छी रांचे राहते घराची खिडकीचे आतील कडी तोडुन आत प्रवेश करून 1 लाख 68 हजार रुपये रोख, मोबाईल व सोन्राचे दागिने असा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन गु..नं 571/2021 भादंवि कलम 457, 380 प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता.

सदर गुन्ह्यातील आरोपीतांचा शोध घेत असतांना पोलीस निरीक्षक संजय सानप यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, वार्ड नं. 2 श्रीरामपूर येथील सराईत आरोपी शहबाज सलीम शहा (वर 24) रा. काझीबाबा चौक वार्ड नं. 2 श्रीरामपूर व नवाज उर्फ बिड्या राजमोहम्मद शेख (वर 31), रा. सिंधी कॉलनी, वार्ड नं. 1 श्रीरामपूर रांनी चोरी केली. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक कृष्णा घारवट, पोलीस हेड कॉन्स्टेबल शेख, पोलीस नाईक गोसावी,पोलीस कॉन्स्टेबल दिघे, आंधळे, राहुल नरवडे, किशोर जाधव या पथकाने आरोपींचा शोध घेवून विचारपुस करता गुन्ह्याची कबुली दिली.

आरोपींनी 65,200 रुपरे रोख फिर्यादीचे आधारकार्ड, मतदान कार्ड, व एक काळी पिशवी असा मुद्देमाल काढून दिला आहे. तसेच गुन्ह्यात वापरलेली अ‍ॅटो रिक्षा क्र. एम. एच. 12 ए. जे. 5814 ही असल्राने ती देखील जप्त केली आहे. यातील आरोपी शहबाज सलीम शहा याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कृष्णा घारवट हे करत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com