बेलापूरात धाडसी दरोडा; लाखोंचा ऐवज लुटला

बेलापूरात धाडसी दरोडा; लाखोंचा ऐवज लुटला

बेलापुर | वार्ताहर

श्रीरामपुर-बेलापुर रोडवर (Shrirampur-Belapur Road) असलेल्या ओम साई पेट्रोल पंपासमोर (Petrol Pump) राहत असलेल्या नेहे यांच्या घरावर दरोडा टाकून चोरट्यांनी जवळपास अडीच लाख रुपयांचा ऐवज लंपास केला.

बेलापूरात धाडसी दरोडा; लाखोंचा ऐवज लुटला
नव्या वर्षात WhatsApp मध्ये येणार नवे फीचर्स, जाणून घ्या...

या बाबत मिळालेली माहिती अशी की, सर्व प्रथम चोरट्यांनी प्रकाश पाटील नाईक याच्या घराचा दरवाजा तोडण्याचा प्रयत्न केला. परंतु आवाजाने युवराज नाईक यांना जाग आली. त्यांनी तातडीने घरातील सर्व लाईट लावले त्यामुळे चोरट्यांनी तेथुन काढता पाय घेतला. त्यानंतर चाँदनगर येथे प्रवेश केला. स्थानिक नागरीकांनी चोरट्यांना पहाताच पोलीसांना फोन केला. पोलीस गाडीच्या सायरनच्या आवाजामुळे चोरटे तेथुन पुढे सरकले.

त्या नंतर नवले वस्तीवरील दादा कुताळ यांच्या वस्तीवर ते गेले तेथेही लोक जागे असल्यामुळे चोरट्यांनी आपला मोर्चा ओम् साई पेट्रोल पंपासमोर राहत असलेल्या बाळासाहेब नेहे यांच्या घराकडे वळविला. तेथे त्यांनी पाठीमागील दरवाजाला लाथ मारली. दोन ते तीन लाथात तो लाकडी दरवाजा उघडला गेला चार जणांनी घरात प्रवेश केला. एक जण बाहेर पहारा देत होता. घरात बाळासाहेब नेहे व त्यांची पत्नी पुष्पा हे दोघेच होते त्यांना एका बाजुला बसवुन चोरट्यांनी घरात उचका पाचक केली. घरातील सोन्याची अंगठी, पोत, गळ्यातील मनीमंगळसूत्र, कानातील झुबे असा चार तोळे दागीने व ५७ हजार रुपये रोख घेवुन चोरट्यांनी अवघ्या दहा मिनीटात तेथुन पोबारा केला.

बेलापूरात धाडसी दरोडा; लाखोंचा ऐवज लुटला
विशाल निकम ठरला Bigg Boss Marathi 3 चा विजेता, जाणून त्याच्याविषयी...

पावणे तीन वाजता उपसरपंच अभिषेक खंडागळे यांना दादा कुताळ यांनी चोर आल्याचे कळविले. त्यांनी तातडीने ग्राम सुरक्षा यंत्रणेद्वारे संदेश दिला. परंतु तोपर्यत चोरटे आपले काम फत्ते करुन पळून गेले. घटना घडताच काही वेळातच पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर कुऱ्हे वस्तीकडे कुत्री भुंकण्याचा आवाज आल्यामुळे हवालदार अतुल लोटके पोलीस नाईक रामेश्वर ढोकणे, गणेश भिंगारदे, पोपट भोईटे, निखील तमनर, हरिष पानसंबळ हे पोलीस त्या दिशेने गेले, परंतु तोपर्यत दरोडेखोर पसार झाले होते. काही वेळातच पोलीस निरीक्षक संजय सानप फौजफाट्यासह घटनास्थळी पोहोचले.

अहमदनगर गुन्हा अन्वेषनची टिमही घटनास्थळी पोहोचली श्वानपथक तसेच ठसे तज्ञांनाही बोलविण्यात आले. उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांनीही घटनास्थळी भेट दिली.

बेलापूरात धाडसी दरोडा; लाखोंचा ऐवज लुटला
Indian Navy Day : छत्रपती शिवाजी महाराजांना 'फादर ऑफ इंडियन नेव्ही' का म्हणतात?

चोरटे मराठीत बोलत होते. पुष्पा नेहे यांच्या कानातील दागिना लवकर निघाला नाही. त्या वेळी निघत नसेल तर राहु द्या काढु नका असेही दरोडेखोर म्हणाले.

बेलापूरात धाडसी दरोडा; लाखोंचा ऐवज लुटला
PHOTO : अंकिता लोखंडेचा मराठमोळा साज; नऊवारीत सौंदर्य दिसतय खुलून
बेलापूरात धाडसी दरोडा; लाखोंचा ऐवज लुटला
सोशल मीडियावर सनी लिओनीच्या अटकेची का होतेय मागणी?

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com