निपाणी वडगाव परिसरात दौंड वस्तीवर दरोडा

निपाणी वडगाव परिसरात दौंड वस्तीवर दरोडा

चाकूचा धाक दाखवत साडे ९ तोळे सोने व १ लाख ३५ हजाराची रोकड लुटली

श्रीरामपूर | प्रतिनिधी

तालुक्यातील निपाणी वडगाव (Nipani Vadgoan) येथील दौंड वस्ती (Daund Vasti) परिसरात कल रात्री दोन ते अडीचच्या सुमारास पाच दरोडेखोरांनी चाकूचा धाक दाखवत तसेच घरातील व्यक्तींना वेठीस धरत सामानाची उचकापाचक करून १ लाख ३५ हजार रोकड व साडेनऊ तोळे सोने असा ऐवज लुटला. या घटनेने परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.

येथील माजी वनाधिकारी दौंड तसेच निपाणी वडगाव येथील माजी सरपंच आशिष दौंड याच्या घरावर हा दरोडा पडला. त्यांनी लगेच घटनेची माहिती परिसरातील नातेवाईक यांना फोन वरून कळवली. यावरून परिसरात नातेवाईक व शेजारी यांच्या मदतीने चोरट्यांचा शोध घेतला असता चोरटे पळून गेल्याने ते सापडले नाही.

यावेळी दौंड यांनी श्रीरामपूर शहर पोलीस (Shrirampur Police) ठाणे याठिकाणी कळविले त्यानंतर अप्पर पोलीस अधीक्षक डॉ.दीपाली काळे, डीवायएसपी संदीप मिटके, पोलीस निरीक्षक संजय सानप तसेच पोलीस उपनिरीक्षक समाधान सुरवाडे, नाईक संजय दुधाडे दत्तात्रय दिघे ,पो कॉ किरण पवार, किशोर जाधव, सुनील दिघे ,पंकज गोसावी ,राहुल नरवडे तसेच नगर येथील एलसीबीच्या पथकाने घटनास्थळी भेट दिली.

भाजपाचे नेते शिवाजी दौंड यांचे वनाधिकारी दौंड बंधू व आशिष दौंड पुतणे आहेत. दरोडेखोरांना तातडीने अटक करावी, अशी मागणी शिवाजी दौड यांनी केली आहे

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com