धुमस्टाईलने गंठण लांबविणार्‍या दोघांना पोलिसांनी पाठलाग करुन पकडले

धुमस्टाईलने गंठण लांबविणार्‍या दोघांना पोलिसांनी पाठलाग करुन पकडले

श्रीरामपूर (प्रतिनिधी)

चालत्या मोटारसायकलवरुन महिलेच्या हातातील पर्स चोरुन लुबाडल्या प्रकरणातील दोघा जणांना श्रीरामपूर शहर पोलिसांनी एका तासाच्या आत अटक केली असून त्यांच्याकडून चोरीस गेलेल्या 71 हजार रुपयांपैकी 1800 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. तसेच अन्य गुन्ह्यातील 1 लाख 64 हजार 900 रुपये किंमतीचा ऐवज हस्तगत केला आहे.

तालुक्यातील माळवाडगाव येथील सविता रावसाहेब दळे (वय 38) ही महिला तिच्या मुलाबरोबर दिवाळी सणाची खरेदी करण्यासाठी श्रीरामपूर शहरात मोटारसायकलवरुन आली होती. खरेदी करुन पुन्हा मोटारसायकलवरुन माळवाडगावकडे जात असताना श्रीरामपूर शहरातील नेवासा रोडवरील धान्य मार्केट कमानीसमोरच पाठीमागून लाल रंगाची एसएफ डिलक्स कंपनीच्या विना नंबरच्या मोटारसायकलवरुन आले आणि पाठीमागे बसलेल्या इसमाने सविता दळे यांच्या हातात असलेली 71 हजार रुपयाचे सोन्याचे मंगळसुत्र व रोख रक्कम असलेली पर्स बळजबरीने ओढून लांबविली. यावेळी पर्स ओढतांना झटका लागल्याने सविता दळे ह्या चालू मोटारसायकलवरुन खाली पडून जखमी झाल्या होत्या. याप्रकरणी सविता दळे यांनी फिर्याद दाखल केल्यानुसार शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

याप्रकरणाच्या तपासाकामी चक्रे फिरवली असता पोलिसांनी तत्परतेने गुन्हेगारांचा बंदोबस्त करण्याच्या सुचना मिळाल्यानुसार पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर. उपविभागीय पोलीस अधिकारी, संदिप मिटके यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी, तपास पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक जिवन बोरसे, पोलीस नाईक कारखेले, पोलीस नाईक फुरकान शेख, पोलीस कॉन्स्टेबल राहुल नरवडे, पोलीस कॉन्स्टेबल रमिहराजा अनार, पोलीस कॉन्स्टेबल गावडे, पोलीस कॉन्स्टेबल गौरव दुबळे, पोलीस कॉन्स्टेबल भारत तमनर व चालक पोहवा भारत जाधव या पथकाने यांनी खाजगी दुचाकीवर मिळालेल्या माहितीच्या आधारे संशयितांचा शोध घेत असताना मिळत्याजुळत्या वर्णनाचे दोन इसम हे लाल काळ्या रंगाचे एच एफ डिलक्स विनानंवर मोटरसायकलवर संशतिरित्या फिरताना मिळुन आले. त्यांना थांबविण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी त्यांची दुचाकी भरधाव वेगाने तेथून पळ काढला परंतु तपास पथकाने सिनेस्टाईल पाठलाग करत दोन्ही बाजूनी घेरले. त्यावेळी चोरांनी पोलीस वाहनास कट मारून पळून जाण्याचे प्रयत्नात दोन्ही मोटारसायकलचा अपघात होवुन खाली पडले. यावेळी त्यांनी दुचाकी जागीच सोडून देत रोडचे कडेला असलेल्या शेतात उंच वाढलेल्या गिन्नी गवतात पळून जाण्याचा प्रयत्न केला; परंतु पोलिसांनी एक तासाच्या आत त्यांच्या मुसक्या आवळल्या. रामस्तान शेख (वय 20) रा. निवाडा वॉर्ड नं. 1. श्रीरामपूर, नशर्रफ रशिद शेख (वय 23) रा. सिद्धार्थनगर कस्तान बोर्ड नं. 1. श्रीरामपूर असे अटक केलेल्या आरोपींची नावे असून त्यांनी सदर गुन्ह्याची कबुली दिली. त्यांच्याकडून पळवून नेलेल्या 71 हजारापैकी केवळ 1800 रुपयांचा ऐवज हस्तगत करण्यात आला.

या दोघांविरुध्द गुन्हे दाखल असून या गुन्ह्यातील गेलेल्या श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनमधील गु.र.नं. 167/ 2022 भादंवि कलम 394.34 यातील मालापैकी 1,800/- रु. रोख, गु.र.नं. 958/ 2022 भादंवि कलम 394 मधील मालापैकी 30 हजार रु. किमतीची हिरो एच एफ डिलक्स मोटारसायकल, 10 हजार रु. किया विवो कंपनीचा मोबाईल, 3 हजार रु. कि. चे चांदीचे ब्रासलेट 100/-रु.रोख, गु.र.नं. 165 2022 भादंवि कलम 394.34 मधील पैकी 45 हजा रु. कि. सोन्याचे मिनी 20हजार रु. रोख तसेच 55 हजार रु.कि.ची सदर गुन्हे करतेवेळी वापरलेली होंडा शाईन मोटारसायकल नं. एम एच-17-6929 असा एकूण 1 लाख 64 हजार 900 रु. किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात येवून सदर गुन्हे उघडकीस आणले आहेत. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक जिवन बोरसे करत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com