लग्नाचे अमिष दाखवून भावी डॉक्टर तरुणीवर अत्याचार; कॉन्स्टेबलविरुध्द गुन्हा

लग्नाचे अमिष दाखवून भावी डॉक्टर तरुणीवर अत्याचार; कॉन्स्टेबलविरुध्द गुन्हा

श्रीरामपूर (प्रतिनिधी)

वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या तरुणीस लग्नाचे अमिष दाखवून वेळोवेळी शरिर संबंध ठेवून गर्भवती ठेवले. गर्भपाताच्या गोळ्या घेण्यास भाग पाडून गर्भपात करण्यास भाग पाडले. तसेच पत्नी व मुले असल्याची लपवून फसवणूक करुन मारहाण केली. याप्रकरणी श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस कॉन्स्टेबलविरुध्द अत्याचार व अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तुळशीराम उर्फ राजू पोपट वायकर असे या गुन्ह्यातील पोलीस कॉन्स्टेबलचे नाव आहे. सन २०१६-१७ साली एका गुन्ह्याच्या तपासाच्या निमित्ताने ओळख झाले आरोपी व पारनेर तालुक्यातील पानोली परिसरात राहणाऱ्या अत्याचारित तरुणीची ओळख झाली. या तरुणीस २०१९ पासून लग्नाचे अमिष दाखवून श्रीरामपूर येथे फ्लॅटवर तसेच बाभळेश्वर व शिर्डी येथे लॉजवर नेवून वेळोवेळी शरीर संबंध ठेवले. त्यातून ती तरुणी गर्भवती राहिली. गर्भवती असल्याचे वायकर यास कळाले त्यावेळी त्याने गर्भपाताच्या गोळ्या घेण्यास भाग पाडून गर्भपात केला. तसेच त्याचे लग्न झालेले असून त्यास अपत्य असल्याची माहिती लपवून ठेवून फसवणूक केली. तुळशीराम वायकर हा १४ ऑगस्ट २०२१ रोजी रात्री

ही तरुणी रहात असलेल्या श्रीरामपूर योथील फ्लॅटवर आला व बळजबरी शरिर संबंध ठेवले व दुसऱ्या दिवशी सकाळी ड्युटीवर जातो व संध्याकाळी परत येतो, असे सांगून गेला ते परत अद्यापपावेतो आलाच नाही. त्यामुळे ही पिडीत तरुणी ३ सप्टेंबर २०२१ रोजी आरोपीच्या मुळगावी नेवासा तालुक्यातील भेंडा येथे त्याचे घरी गेली असता तुळशीराम उर्फ राजु पोपट वायकर व त्याची आई सईबाई पोपट वायकर, पत्नी हिराबाई तुळशीराम वायकर यांनी या तरुणीस तू खालच्या जातीची असून आमच्या घरात तुला घेणार नाही, असे म्हणून जातीवाचक शिवीगाळ करुन मारहाण केली. तर आरोपी तुळशीराम उर्फ राजू वायकर म्हणाला, तुझा माझा काहीएक संबंध नाही. तु परत येथे दिसली तर मारुन टाकीन, अशी धमकी दिली.

याप्रकरणी श्रीरामपूर पोलीस ठाण्यात सदर पिडीत महिलेने फिर्याद दाखल केली असून पोलिसांनी गुन्हा रजि. नं. ५९४/२०२१ प्रमाणे तुळशीराम उर्फ राजू पोपट वायकर, सईबाई पोपट वाकर, हिराबाई तुळशीराम वायकर यांचे विरुध्द भादंवि कलम ३७६ (२), (एन) ३१३, ४२०, ४१७, ३२३, ५०४, ५०६, ३४, अनु. जाती जमाती कायदा कलम ३(१) (४) (५) ३ (१) (डब्ल्यु) ३ (२), (५) ४३ (२) (एसए) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com