मास्क विचारला म्हणून पोलीस हवालदाराला लाथाबुक्क्यांनी मारहाण

मास्क विचारला म्हणून पोलीस हवालदाराला लाथाबुक्क्यांनी मारहाण

दोघा जणांना अटक

श्रीरामपूर | प्रतिनिधी | Shrirampur

मास्क (Mask) का घातला नाही, अशी विचारणा केल्याचा राग येऊन पोलीस हवालदाराला (police constable) लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना तालुक्यातील अशोकनगर फाटा (Ashoknagar Fhata) येथे घडली. याप्रकरणी पोलिसांनी दोघा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.

मास्क विचारला म्हणून पोलीस हवालदाराला लाथाबुक्क्यांनी मारहाण
चितळीत तरुणाची आत्महत्या; पोलीस कर्मचार्‍याने छळ केल्याचा संदेश व्हायरल

श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनला (Shrirampur City Police Sation) कार्यरत असणारे पोलीस हवालदार रघुनाथ खेडकर (वय 53) वर्ष हे शुक्रवारी 2 जुलै रोजी सायंकाळच्या सुमारास अशोकनगर फाटा येथे सरकारी आदेशानुसार दुकाने बंद करत असताना तेथे असलेले सोमनाथ भाऊराव कुदळे (रा. अशोकनगरफाटा) व बाळासाहेब निवृत्ती घोडे (रा. महांकाळ वाडगाव) यांना खेडकर यांनी मास्क का घातले नाही असे विचारले.

याचा राग आल्याने सोमनाथ कुदळे याने हवालदार खेडकर यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करून कॉलर धरून शर्टचे बटन तोडून गळ्यातील आयकार्ड हिसकावून फेकून दिले. तसेच बाळासाहेब घोडके याने देखील वाईट शिवीगाळ करून खोट्या गुन्ह्यात नाव घेऊन नोकरी घालवतो अशी धमकी दिली आणि शासकीय कामात अडथळा आणला. 

म्हणून पोलीस हवालदार खेडकर यांच्या तक्रारीवरून श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 436/2021 भादवि कलम 353 वगैरे प्रमाणे सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा काल रात्री उशिरा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी कुदळे व घोडे यांना अटक केली आहे. या गुन्ह्याचा तपास शहर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय सानप यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com