बाहेरील तरुणांना शाळेत आणून मारहाण

घटनेची तातडीने चौकशी करण्याची पालकांची मागणी
बाहेरील तरुणांना शाळेत आणून मारहाण

श्रीरामपूर (प्रतिनिधी)

श्रीरामपूर शहरातील एका शाळेत काल किरकोळ कारणावरून भांडणाचा प्रकार होवून त्याचे पर्यासन हाणामारीत झाले. बाहेरून तरुणांना बोलावून शाळेत झालेल्या या हाणामारीची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे.

या मारहाणीत एका विद्यार्थ्याच्या डोक्यात मोठी जखम झाली. ही जखम गावठी कट्ट्याचा मागील भाग डोक्यात मारल्याने झाल्याची चर्चा शाळा परिसरात आहे.

या शाळेतील इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांमध्ये बेंचवर बसण्यावरुन वाद झाले होते. ते शिक्षकांनी तसेच संस्थेच्या पदाधिकार्‍यांनी मिटवले होते. परंतू संध्याकाळी शाळा सुटण्याच्यावेळेस 5 वा. शिक्षकांची मिटींग सुरू होती आणि काही मुलं शाळेच्या आवारात होते. तेव्हा एका विद्यार्थ्यांचा भावाने त्याचे तीन-चार मित्र मोटारसायकलवर घेवून आला. त्यांनी काल भांडण झालेल्या विद्यार्थ्याला धरून मारहाण करायला सुरूवात केली तसेच इतरही मुलांना मारहाण करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याने विद्यार्थ्यांची पळापळ झाली.

या मारहाणीत एका विद्याथ्यार्ंच्या डोक्याला मार लागून तो जखमी झाला. अशा प्रकारच्या घटना या शाळेत वारंवार घडू लागल्याने पालकांमध्ये नाराजी पसरली असून अशा घटना वारंवार होवू नये म्हणून बाहेरुन तरुणांना शाळेत घेवून येणार्‍याची तातडीने चौकशी करावी, अशी मागणी पालक वर्गाने केली आहे. याबाबत शाळा व्यवस्थापनाशी संपर्क साधून माहिती घेतली असता या भांडणाच्या प्रकाराला शाळेने दुजोरा दिला असून याबाबत योग्य ती कारवाई केली जाईल, असेही सांगण्यात आले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com