श्रीरामपुरात चेन स्नॅचिंग करणारे दोन आरोपी अटकेत
सार्वमत

श्रीरामपुरात चेन स्नॅचिंग करणारे दोन आरोपी अटकेत

Arvind Arkhade

श्रीरामपूर|प्रतिनिधी|Shrirampur

श्रीरामपूर शहर पोलिसांनी शहरात चेन स्नॅचींग करणार्‍या दोघा सराईत गुन्हेगारांना जेरबंद केले असून त्यांनी गुन्ह्यासाठी वापरलेली मोटारसायकलही ताब्यात घेतली आहे. शहरातील सोनसाखळीच्या गुन्हाची उकल होण्याची शक्यता आहे.

श्रीरामपूर शहरातील मोरगे वस्ती परिसरात राहणार्‍या सुवर्णा मच्छिंद्र हिरे या 16 जून रोजी दुपारी 3.45 च्या सुमारास मोरगे वस्ती रोडने आपल्या स्कुटीवरून जात होत्या. त्याचवेळी राहींज हॉस्पिटलच्या पुढे त्यांच्या पाठीमागून काळपट रंगाचे कपडे घातलेले दोन अज्ञात इसम मोटारसायकलवरून आले व त्यांच्या गळ्यातील सोन्याचे गंठण ओरबाडून नेल्याची घटना घडली होती.

त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून श्रीरामपूर शहर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली. शहरातील सराईत व तडीपार गुन्हेगार आनंद यशवंत काळे याच्यासह त्याच्या साथीदाराने हा गुन्हा केला असून तो परत शहरात येणार असल्याची गुप्त माहिती पोलीस निरीक्षक श्रीहरी बहीरट यांना मिळाली होती.त्यावरून त्यांनी डीबी पथकाचे सहायक निरीक्षक संतोष बहाकर, पो. हे. कॉ. जालिंदर लोंढे, पो. कॉ. अर्जुन पोकळे, किशोर जाधव, पंकज गोसावी, सुनील दिघे, गणेश गावडे, महेंद्र पवार आदींच्या पथकावर पुढील कामगिरी सोपवली.

या पथकाने सापळा लावून सदर गुन्हेगार आनंद यशवंत काळे, रा. सूतगिरणी परिसर, दत्तनगर व सनी विजय भोसले, रा. दत्तनगर यांना गुन्ह्यात वापरलेल्या अपाची मोटारसायकल क्रमांक-एमएच 17 एटी 4612 यासह ताब्यात घेतले आहे. त्यांच्यावर यापूर्वीही पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

Deshdoot
www.deshdoot.com