श्रीरामपुरात एका तरुणास तलवारीसह रंगेहाथ पकडले
चोरी

श्रीरामपुरात एका तरुणास तलवारीसह रंगेहाथ पकडले

श्रीरामपूर | प्रतिनिधी

श्रीरामपूर (Shrirampur) शहरातील वार्ड नंबर (Ward No 1) एक परिसरातील दशमेश चौक (Dashmesh Chauk) येथे एका तरुणास पोलिसांनी तलवारीसह (sword) रंगेहाथ पकडले. त्याच्याविरुद्ध आर्म ऍक्ट (ARMS ACT) खाली गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे (Shrirampur Police Station) पोलीस नाईक पवार यांना काल रात्री मनोज नवनाथ इंगळे ( वय 32, रा. गोंधवणी रोड, वॉर्ड नंबर 1, श्रीरामपूर) याच्याकडे एक धारदार व टोकदार तलवार विनापरवाना बेकायदेशीररीत्या मिळून आली. याप्रकरणी त्यांनी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली.

या तक्रारीवरून श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक श्री. संजय सानप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक दिघे हे करीत आहेत. पोलिसांनी तात्काळ इंगळे याला अटक केली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com