इन्स्टाग्रामवर शिवीगाळ करतो म्हणून अशोकनगर फाट्यावर एकास मारहाण

साेशल मीडिया
साेशल मीडिया

श्रीरामपूर (प्रतिनिधी)

इन्स्टाग्रामवर शिवीगाळ करतो या कारणातून एकाला अशोकनगर फाट्यावर बोलावून घेवून बेदम मारहाण करत 9 हजार रुपये व 4 ग्रॅम सोन्याची अंगठीही घेवून जाण्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

श्रीरामपूर शहरातील वॉर्ड नं. 2 मध्ये राहणार्‍या अमन अजीज पठाण (वय 20) चंदा-प्रवरा पाण्याची एजन्सी याचा पाण्याच्या बाटलीचा व्यवसाय आहे.असून दि. 15 नोव्हेंबर रोजी सायं. 7 ला एका अनोळखी इसमाचा फोन आला व त्याने 50 पाण्याचे बॉक्स अशोकनगर फाट्यावर घेवून ये, अशी ऑर्डर दिली. ऑर्डर घेवून अमन त्या ठिकाणी गेल्यानंतर सदर इसमाने त्याच्या तीन साथीदारांसह अमनला मारहाण करण्यास सुरुवात केली.

इन्स्टाग्रामवर शिवीगाळ करतो, तू खुप माजला आहे, असे म्हणत त्यांनी अमनला लाथाबुक्क्यांनी तसेच रॉडने मारहाण केल्याने दात पडून तो जखमी झाला. यावेळी भांडण सोडविण्यासाठी आलेला अमनचा मित्र रेहा बागवान यालाही धमकाविण्यात आले. आरोपींनी जाताना 9 हजार रुपये व माझी 4 ग्रॅम सोन्याची अंगठीही नेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात अमन अजिज पठाण याने फिर्याद दिली असून पोलिसांनी अनोळखी व्यक्तीविरोधात भादंवि कलम 323, 325, 327, 504, 506, 34 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास श्रीरामपूर पोलीस करीत आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com