धक्कादायक! पत्नीची कुदळी डोक्यात मारुन तर चार वर्षाच्या मुलास गळफास देवून केली हत्या

धक्कादायक! पत्नीची कुदळी डोक्यात मारुन तर चार वर्षाच्या मुलास गळफास देवून केली हत्या

श्रीरामपूर | प्रतिनिधी

श्रीरामपूर (Shrirampur) शहरातील गोंधवणी (Gondhwani) भागात राहणाऱ्या एका जणाने पत्नीची कुदळीच्या सहायााने हत्या केली. तसेच चार वर्षाच्या मुलाच्या गळ्यास दोरीने फास देवून हत्या केली. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात (Shrirampur police station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

श्रीरामपूर शहरातील गोंधवणी भागातील खबडीत राहणा-या बलराम कुदळे (वय 40 ) या नाराधम माणसाने घरगुती वादातून काल सकाळी त्याची पत्नी अक्षता (वय 35) हिच्या डोक्यात कुदळीच्या वार करून तिची हत्या केली. तसेच मुलगा शिवतेज (वय 4 वर्ष) याला आंब्याच्या झाडाला नायलॉन दोरीने गळफास देवुन जिवे ठार मारले. (Shrirampur murder news)

याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात बलराम कुदळे विरोधात खुनाचा गुन्हा दाखल होत आहे. आज श्रीरामपूरचे ग्रामदैवत प्रभु श्रीराम यांची रामनवमी या पवित्र दिनी दोन जणांची हत्या केल्यामुळे श्रीरामपूर शहरात खळबळ माजली असून समाजातून हळहळ व्यक्त होत आहे

Related Stories

No stories found.