श्रीरामपूरात चन्या बेग व अर्जुन दाभाडे यांच्यातील टोळीयुद्ध भडकले

पोलिसांत परस्पर विरोधी फिर्यादी
श्रीरामपूरात चन्या बेग व अर्जुन दाभाडे यांच्यातील टोळीयुद्ध भडकले

श्रीरामूर (प्रतिनीधी)

श्रीरामपूरातील चन्या बेग आणि अर्जुन दाभाडे यांच्यातील टोळीयुद्ध भडकण्यापूर्वीच श्रीरामपूरचे पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांनी गुन्हा दाखल करून घेतला.

फरार असलेल्या दोन्हीं टोळीतील संशयितांना पकडण्यासाठी पोलिस पथके रवाना करण्यात आली आहेत.

बेग आणि दाभाडे टोळी विरोधात खूनाचा प्रयत्न करणे या कलमान्वये परस्पर विरोधी गुन्हा दाखल झाला आहे. दोन दिवसांपूर्वी श्रीरामपूर तालुक्यातील गोंडेगाव आणि काल गोंधवणी रोडवरील दत्त मंदिर पाठीमागे हे टोळीयुद्ध भडकले.

श्रीरामपूरात चन्या बेग व अर्जुन दाभाडे यांच्यातील टोळीयुद्ध भडकले
नारायगव्हाणचे माजी सरपंच राजाराम शेळके यांची निर्घृण हत्या

निमगाव खैरी येथील निलेश बाळासाहेब परदेशी या किरण दुकानदाराने पहिली फिर्याद दिली आहे. या फिर्यादीत अर्जुन खुशाल दाभाडे, उद्वेश मंडलिक, विकी डमके, विजय हतांगले उर्फ घोगर, मंगेश, सागर धुमाळ, नमोद उर्फ नाम्या (सर्व रा.गोंधवणी) अशी या गुन्ह्यातील आरोपींची नावे आहेत. दुसरी फिर्याद हिना तनवीर शहा यांनी दिली आहे. या फिर्यादीत सागर उर्फ चन्या बेग, सोन्या बेग, लखन माहीजा, सुधीर काळोखे, गोऱ्या जेधे व इतर पाच ते सहा आरोपीविरोधात खुनाचा प्रयत्न करणे या कलमान्वये गुन्हा दाखल झाला आहे.

पहिल्या गुन्ह्यातील फिर्यादी निलेश परदेशी हे इनोव्हा गाडीतून गोंडेगाव येथे मित्राला भेटण्यासाठी गेले होते. त्यावेळी दाभाडे टोळीने त्यांच्या गाडीला दुसरी गाडी आडवी लावून 'तुझा गेमच करतो, तुला जिवंत सोडणार नाही' असे म्हणत चाकूचा वार केला. हा चाकूचा वार त्याच्या गालातून आरपार गेला. त्यात परदेशी जखमी झाला.

हिना शहा यांनी दिलेल्या फिर्यादीत चन्या बेग टोळी विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. बेग टोळीने शहा यांच्या घरी जात तनवीर शहा यांच्या डोक्याला पिस्तूल लावले. 'अर्जुन दाभाडे बरोबर का राहतो' असे म्हणत गोळ्या घालून मारतो अशी धमकी दिली. घराच्या खिडकीच्या काचा फोडून फेकाफेक करत दहशत निर्माण केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

दाभाडेने केली टोळी

श्रीरामपूरमध्ये बेग व दाभाडे टोळीची मोठी दहशत आहे. या टोळी विरोधात पोलीस कारवाई झाल्यानंतर बेग टोळी मोक्का गुन्ह्यात गजाआड झाली. चन्या बेग अटकेत असल्याने अर्जुन दाभाडे यांनी दुसरी टोळी निर्माण केली. बेग अटकेतून बाहेर आल्यानंतर त्याने नव्याने निर्माण झालेल्या दाभाडे टोळीला टारगेट केले. या दोघांचे टोळीयुद्ध भडकण्यापूर्वीच श्रीरामपूरचे पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांनी परस्पर विरोधी गुन्हे दाखल करून घेत दोन्ही टोळीतील गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यासठी पोलिस पथके रवाना झाली आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com