
श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur
श्रीरामपूर शहरातून दोन अल्पवयीन मुलींना फूस लावून पळवून नेण्यात आले आहे. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात मिसिंगची नोंद करण्यात आली आहे.
श्रीरामपूर शहरातील वार्ड नं. 2, गुलशन चौक परिसरात राहणारी अल्पवयीन मुलगी 13 डिसेंबर रोजी 12 च्या सुमारास शाळेतून घरी आली नाही म्हणून तिची चौकशी केली असता तिला कोणीतरी अज्ञात इसमाने फूस लावून पळवून नेल्याचे समजले.
याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात मुलीच्या वडिलांनी फिर्याद दाखल केली असून पोलिसांनी अज्ञात इसमाविरुध्द भादंवि कलग 363 अन्वये गुन्हा दाखल केला आहे तर श्रीरामपूर शहरातील सूतगिरणीरोड परिसरात दुसरी घटना घडली आहे. या परिसरातील एका 15 वर्षाच्या अल्पवयीन मुलीला लग्नाचे अमीष दाखवून दि. 11 डिसेंबर रोजी पहाटे 2 ते 5 च्या सुमारास राहत्या घरातून चेतन भाऊलाल कासवत (वय 19) रा. निलकंठ गार्डन बिल्डिंगसमोर,पुर्णवादनगर, वार्ड नं. 7, श्रीरामपूर याने पळवून नेली.
याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात अल्पवयीन मुलीच्या वडीलांनी फिर्याद दाखल केली असून पोलिसांनी चेतन भाऊलाल कासवत याच्याविरोधात भादंवि कलम 366, 366अ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास श्रीरामपूर पोलीस करीत आहे.