महाविद्यालयीन तरूणीला फूस लावून पळविले

महाविद्यालयीन तरूणीला फूस लावून पळविले

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

श्रीरामपूर शहरातून 12वीत शिक्षण घेणार्‍या कॉलेज तरुणीला फूस लावून पळवून नेण्याचा प्रकार घडला आहे. याबाबत या मुलीच्या पित्याने पोलिसांत फिर्याद दिल्यावरून गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

शहरातील वॉर्ड नं. 6 परिसरातील ही अल्पवयीन मुलगी दि. 18 नोव्हेंबर रोजी रात्री आई-वडिलांसोबत जेवण करून सर्वजण रात्री 9.30 च्या सुमारास झोपले होते. पहाटे 4 च्या सुमारास या मुलीची मोठी बहीण उठली असता तिला शेजारी झोपलेली लहान बहीण दिसली नाही. त्यांनी सर्वत्र शोध घेतला असता सदर अल्पवयीन मुलगी सापडली नाही.

याबाबत अज्ञात इसमाने आमच्या राहत्या घरातून या मुलीस फूस लावून पळवून नेल्याची फिर्याद मुलीच्या वडिलांनी दिली. त्यानुसार श्रीरामपूर शहर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध भादंवि कलम 363 नुसार गुन्हा दाखल केला असून श्रीरामपूर पोलीस पुढील तपास करीत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com