
श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur
शहरातील सम्राटनगर, सूतगिरणी परिसरात राहणारा तरूणास त्याच्या आजोबाने विजबिलाच्या पैशांच्या कारणावरून शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण करत कुर्हाडीने वार करत जिवे मारण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील सम्राटनगर, सूतगिरणी परिसरातील हर्षद कैलास धनवटे (वय 23) याला व त्याच्या भावास त्यांचे चुलत आजोबा रामनाथ केशव धनवटे, रा. सम्राटनगर, सूतगिरणी परिसर, श्रीरामपूर यांनी विजबिलाच्या पैशांच्या कारणावरून शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच लाकडी दांड्यांने व कुर्हाडीने वार करुन जखमी करुन जीवे ठार मारण्याची धमकी दिली.
याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात जखमी हर्षद कैलास धनवटे याने फिर्याद दाखल केली असून पोलिसांनी चुलत आजोबा रामनाथ केशव धनवटे याच्याविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक संजय सानप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक राशिनकर हे पुढील तपास करत आहे.