श्रीरामपुरात दहशत पसरविण्याच्या हेतूने तरुणाच्या हातात तलवार व चाकू आढळला

तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल
श्रीरामपुरात दहशत पसरविण्याच्या हेतूने तरुणाच्या हातात तलवार व चाकू आढळला

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

श्रीरामपूर शहरातील वॉर्ड नं. 2, परिसरात दहशत पसरविण्याच्या हेतूने एका तरुणाच्या हातात तलवार व चाकू पोलिसांना आढळून आले. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात आर्म अ‍ॅक्ट व दहशत पसरविण्याच्या हेतूप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील वॉर्ड नं. 2 मध्ये काही वाद चालू असल्याची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक संजय सानप, पोलीस कॉन्स्टेबल राहुल नरवडे, श्री. कारखेले, अमोल जाधव व मनोज, पोलीस कॉन्स्टेबल गावडे हे पोलीस त्या ठिकाणी पोहोचताच त्या ठिकाणी अफरोज शाह याच्या हातात तलवार व चाकू पोलिसांना आढळून आला. अफरोज हा या परिसरात दहशत पसरवत असल्याचे आढळून आले. पोलिसांनी तातडीने त्यास ताब्यात घेतले.

याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात अफरोज शाह याचेविरुध्द आर्म अ‍ॅक्ट 4/25, दहशत पसरविणे म्हणून कलम 7 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या भागात लहान मुलाच्या कारणावरुन वाद झाले होते. हे वाद मोठ्या माणसांपर्यंत गेल्याने ते विकोपाला गेले. तरुणांनी काही क्षणात गर्दी केली होती. अफरोज शाहला पोलीस ठाण्यात आणल्यानंतर पोलीस ठाण्यात मोठी गर्दी जमली होती. पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्याने पुढचा मोठा अनर्थ टळला. नाहीतर ऐन रमजान उपवासाच्या काळातच मोठा अनर्थ घडला असता. पोलिसांच्या कार्यतत्परतेने ही घटना टळली.

Related Stories

No stories found.