श्रीरामपुरातील गुन्हेगारीत मोठ्या प्रमाणात वाढ

पोलीस प्रशासनाने कारवाई करावी
श्रीरामपुरातील गुन्हेगारीत मोठ्या प्रमाणात वाढ

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

मागील काही दिवसांपासून सणासुदीचा काळ असो किंवा इतर वेळीही श्रीरामपुरात घरफोड्या, रस्तालुट, लहान मुलींना पळवून नेणे यासह अवैध्य व्यवसायात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. याविरुद्ध पोलीस प्रशासनाने लवकरात लवकर कारवाई करावी, अन्यथा शिवसेना स्टाईलने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा पोलिसांना दिलेल्या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

श्रीरामपुरातील गुन्हेगारीवर पोलिस प्रशासन संथ गतीने कारवाई करत आहे. मोबाईल चोर, गाडी चोर यांनी तर धुडगूस घातला आहे. पोलीस अधिक्षक राकेश ओला यांनी आताच नगरचा अधिभार स्विकारला असून त्यांनी अवैध धंदे आणि गुन्हेगारीवर वचक निर्माण करण्याचे आदेश पोलीस प्रशासनाला दिले आहेत. परंतू पोलीस प्रशासन तोकड्या कारवाया करून मुख्य गुन्हेगारांवर कारवाई करताना दिसत नाही.

शेतकर्‍यांच्या गोडाऊनमधील धान्य आता चोरीला जाऊ लागले आहे. त्यामध्ये सोयाबीन, कांदा असा माल मोठ्या प्रमाणात चोरून नेला जात आहे. यासह गंठण चोरी, जबरी चोरी, दरोडेही वाढले आहेत. याविरुद्ध पोलीस प्रशासनाने लवकरात लवकर कारवाई करावी, नाहीतर शिवसेना पुढील दिवसात शिवसेना स्टाईलने तीव्र आंदोलन करेल, असे निवेदनात म्हटले आहे. यावेळी शिवसेना उपशहर प्रमुख रोहित भोसले, कार्याध्यक्ष राहुल रणधीर, मोरगेवस्ती विभागप्रमुख अल्पेश ठोंबरे, गोधवणी विभागप्रमुख उमेश आल्हाट, निखिल वाडेकर, शाखाप्रमुख प्रशांत कुमावत, संकेत भोसले आदी उपस्थित होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com