श्रीरामपूर तालुक्यात 19 करोनाबाधित रुग्ण

करोना
करोना

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

श्रीरामपूर तालुक्यात काल 19 करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. अ‍ॅक्टीव्ह रुग्णांची संख्या 178 असून हे सर्व रुग्ण वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत. उपचार घेऊन बरे झालेल्यांची संख्या काल 33 होती.

खासगी रुग्णालयात 15 तर अ‍ॅन्टीजेन तपासणीत 04 असे रुग्ण आढळून आले आहेत. श्रीरामपूर तालुक्यात गेल्या काही दिवसात सुमारे 15989 रुग्णांना करोनाची लागण झाली होती. तर त्यातील सुमारे 15846 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. श्रीरामपूर शहरात काल वॉर्ड नं. 1-02, वॉर्ड नं. 3-02, वॉर्ड नं.7-01 व ग्रामीण भागात बेलापूर खुर्द-01, उक्कलगाव- 01, पढेगाव-01, ब्राम्हणगाव-01, गोंधवणी-01, खंडाळा- 02, भामाठाण-01, निपाणीवाडगाव-01, अशोकनगर-01, असे 10 रुग्ण आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com