श्रीरामपूर तालुक्यात 177 अ‍ॅक्टीव्ह रुग्ण

श्रीरामपूर तालुक्यात 177 अ‍ॅक्टीव्ह रुग्ण

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

श्रीरामपूर (Shrirampur) तालुक्यात काल केवळ 18 नवीन करोनाबाधित रुग्ण (Covid 19 Positive Patient) आढळून आले आहेत. आता 177 रुग्ण अ‍ॅक्टीव्ह असून ते वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत. उपचार घेऊन बरे झालेल्यांची संख्या काल 18 होती.

जिल्हा रुग्णालयात 02, खासगी रुग्णालयात 11 तर अ‍ॅन्टीजेन तपासणीत 05 असे रुग्ण आढळून आले आहेत. श्रीरामपूर तालुक्यात गेल्या काही दिवसात सुमारे 15915 रुग्णांना करोनाची लागण झाली होती. तर त्यातील सुमारे 15763 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे.

श्रीरामपूर शहरात काल वॉर्ड नं. 1-02, व ग्रामीण भागात बेलापूर बुद्रुक-02, नरसाळी-01, पढेगाव-01, दत्तनगर-01, भामाठाण-05, निपाणीवडगाव-01 असे 11 रुग्ण आहेत. बाहेरील तालुक्यातील 05 रुगण बाधित आढळून आले आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com