श्रीरामपूर तालुक्यात 177 अ‍ॅक्टीव्ह रुग्ण

श्रीरामपूर तालुक्यात 177 अ‍ॅक्टीव्ह रुग्ण

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

श्रीरामपूर (Shrirampur) तालुक्यात काल केवळ 20 करोनाबाधित रुग्ण (Covid 19 Positive Patient) आढळून आले आहेत. काल 177 रुग्ण अ‍ॅक्टीव्ह (Active Patient) असून ते वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत. उपचार घेऊन बरे झालेल्यांची संख्या काल 07 होती. खासगी रुग्णालयात 18 तर अ‍ॅन्टीजेन तपासणीत (Antigen Testing) 02 असे रुग्ण आढळून आले आहेत.

श्रीरामपूर तालुक्यात (Shrirampur Taluka) गेल्या काही दिवसांत सुमारे 15897 रुग्णांना करोनाची लागण (Covid 19 Positive) झाली होती. तर त्यातील सुमारे 15745 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. श्रीरामपूर शहरात काल वॉर्ड नं. 1-01, वॉर्ड नं. 4-02, वॉर्ड नं. 7-03 असे 06 तर ग्रामीण भागात मालुंजा-01, वळदगाव-01, महांकाळवाडगाव-01, शिरसगाव-01, नायगाव-01, जाफराबाद-01, भामाठाण-05, अशोकनगर-01, असे 12 रुग्ण आहेत.

बाहेरील तालुक्यातील 02 रुगण बाधित आढळून आले आहेत. श्रीरामपूर तालुक्यात कालची रुग्णसंख्या 20 असून शहरात 06 तर ग्रामीण भागात 12 तसेच ज्या रुग्णाचे नाव, मोबाईल नंबर व पत्ता चुकीचा आहे असा 02 रुग्ण असून श्रीरामपूर तालुक्यात असे एकूण 20 करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com