श्रीरामपूर तालुक्यात 23 करोनाबाधित रुग्ण

19 डिस्चार्ज तर 113 अ‍ॅक्टीव्ह रुग्ण
श्रीरामपूर तालुक्यात 23 करोनाबाधित रुग्ण

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

श्रीरामपूर तालुक्यात (Shrirampur Taluka) काल नवीन 23 करोनाबाधित रुग्ण (Covid 19 Positive Patient) आढळून आले आहेत. तर 19 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. 113 करोनाचे अ‍ॅक्टीव्ह रुग्ण (Active Patient) उपचार घेत आहेत.

काल खासगीत 12 तर अ‍ॅन्टीजन तपासणीत (Antigen Testing) 11 असे 23 रुग्ण आढळून आले आहेत. श्रीरामपूर तालुक्यात (Shrirampur Taluka) गेल्या काही दिवसांत सुमारे 17045 रुग्णांना करोनाची लागण झाली होती. तर त्यातील सुमारे 16926 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे.

श्रीरामपूर शहरात (Shrirampur City) 08 तर ग्रामीण भागात 15 व बाहेरील तालुक्यातील ज्यांचे नाव, फोन नंबर नाही-00 असे एकूण 23 रुग्ण आहेत. शहरी भागात वॉर्ड नं. 1-01, वॉर्ड नं. 2-01, वॉर्ड नं. 3-02, वॉर्ड नं. 7-04 असे शहरात 08 तर ग्रामीण भागात बेलापूर बुद्रुक-02, वांगी खुर्द-02 उक्कलगाव-01, वळदगाव-01, मातापूर-01,खानापूर-01, खंडाळा-01, टाकळीभान-03, भोकर-02, निमगाव खैरी-01, असे एकूण 23 करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com