श्रीरामपूर तालुक्यात 31 करोनाबाधित रुग्ण

28 डिस्चार्ज तर 109 अ‍ॅक्टीव्ह रुग्ण
श्रीरामपूर तालुक्यात 31 करोनाबाधित रुग्ण

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

श्रीरामपूर तालुक्यात (Shrirampur Taluka) काल नवीन 31 करोनाबाधित रुग्ण (Covid 19 Positive Patient) आढळून आले आहेत. तर 28 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. 109 करोनाचे अ‍ॅक्टीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत.

काल खासगीत 29 तर अ‍ॅन्टीजन तपासणीत (Antigen Testing) 02 असे 31 रुग्ण आढळून आले आहेत. श्रीरामपूर तालुक्यात (Shrirampur Taluka) गेल्या काही दिवसांत सुमारे 17022 रुग्णांना करोनाची लागण (Covid 19) झाली होती. तर त्यातील सुमारे 16907 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे.

श्रीरामपूर शहरात 09 तर ग्रामीण भागात 18 व बाहेरील तालुक्यातील ज्यांचे नाव, फोन नंबर नाही-04 असे एकूण 31 रुग्ण आहेत. शहरी भागात वॉर्ड नं. 1-02, वॉर्ड नं. 3-02, वॉर्ड नं. 7-05 असे शहरात 09 तर ग्रामीण भागात ऐनतपूर-02, उक्कलगाव-01, मालुंजा-01, कारेगाव-01, मातापूर-01, वळदगाव-01, टाकळीभान-03, भोकर-03, वांगी खुर्द-02, निमगाव खैरी-01, दत्तनगर-01, खानापूर-01 असे ग्रामीण भागात 18 आढळून आले आहेत. बाहेरील अन्य जिल्हा व अन्य तालुक्यातील ज्यांचे नाव, फोन नंबर नाहीत असे 04 असे 31 करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com