श्रीरामपूर तालुक्यात 13 करोनाबाधित रुग्ण

श्रीरामपूर तालुक्यात 13 करोनाबाधित रुग्ण

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

श्रीरामपूर (Shrirampur) तालुक्यात काल 13 करोनाबाधित रुग्ण (Covid 19 Positive Patient) आढळून आले तर 18 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आता 103 करोनाचे अ‍ॅक्टीव्ह रुग्ण (Active Patient) उपचार घेत आहेत.

काल खासगीत 10 तर अ‍ॅन्टीजेन तपासणीत (Antigen Testing) 03 असे 13 रुग्ण आढळून आले आहेत. श्रीरामपूर (Shrirampur) तालुक्यात गेल्या काही दिवसांत सुमारे 16945 रुग्णांना करोनाची लागण (Covid 19 Positive) झाली होती. त्यातील सुमारे 16803 रुग्णांनी करोनावर मात केली आहे.

श्रीरामपूर (Shrirampur) शहरात 04 तर ग्रामीण भागात 05 व बाहेरील तालुक्यातील ज्यांचे नाव, फोन नंबर नाही-04 असे एकूण 13 रुग्ण आहेत. शहरी भागात वॉर्ड नं. 7-04 तर ग्रामीण भागात ऐनतपूर-01, भेर्डापूर-01, ब्राम्हणगाव-01, शिरसगाव-01, भामाठाण-01 असे ग्रामीण भागात 05 आढळून आले आहेत. बाहेरीत अन्य जिल्हा व अन्य तालुक्यातील ज्यांचे नाव, फोन नंबर नाहीत असे 04 असे एकुण 13 करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com