श्रीरामपूर तालुक्यात 147 रुग्ण अ‍ॅक्टीव्ह

श्रीरामपूर तालुक्यात 147 रुग्ण अ‍ॅक्टीव्ह

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

श्रीरामपूर (Shrirampur) तालुक्यात काल 23 करोनाबाधित रुग्ण (Covid 19 Patient) आढळून आले आहेत. 147 रुग्ण अ‍ॅक्टीव्ह असून ते वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत. उपचार घेऊन बरे झालेल्यांची संख्या काल 15 होती.

खासगी रुग्णालयात 17 तर अ‍ॅन्टीजेन तपासणीत (Antigen Testing) 06 असे रुग्ण आढळून आले आहेत. श्रीरामपूर तालुक्यात गेल्या काही दिवसांत सुमारे 15743 रुग्णांना करोनाची लागण (Corona infection) झाली होती. तर त्यातील सुमारे 15609 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे.

श्रीरामपूर शहरात काल वॉर्ड नं. 3-02, वॉर्ड नं. 6 -02, वॉर्ड नं. 7-02 असे 06 तर ग्रामीण भागात बेलापूर-02, पढेगाव-01, उंबरगाव-01, वांगी बुद्रुक-2, ब्राम्हणगाव-1, निमगावखैरी-1, दिघी-01, शिरसगाव-2, गोंडेगाव-1, निपाणीवाडगाव-01 असे 13 रुग्ण आहेत.श्रीरामपूर शहरात कालची रुग्णसंख्या 06 असून ग्रामीण भागात 13 तर ज्या रुग्णाचे नाव, मोबाईल नंबर व पत्ता चुकीचा आहे असा 04 रुग्ण असून तालुक्यात असे एकूण केवळ 23 करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com