श्रीरामपूर तालुक्यात 17 करोनाबाधित रुग्ण

03 रुग्णांना डिस्चार्ज
श्रीरामपूर तालुक्यात 17 करोनाबाधित रुग्ण
करोना

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

श्रीरामपूर (Shrirampur) तालुक्यात काल केवळ 17 करोनाबाधित रुग्ण (Covid 19 Positive Patient) आढळून आले आहेत. काल अ‍ॅक्टीव्ह रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. हे सर्व रुग्ण वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत. उपचार घेऊन बरे झालेल्यांची संख्या काल केवळ 03 होती.

जिल्हा रुग्णालयात 01, खासगी रुग्णालयात 03 तर अ‍ॅन्टीजेन तपासणीत 13 असे रुग्ण आढळून आले आहेत. श्रीरामपूर तालुक्यात गेल्या काही दिवसांत सुमारे 15932 रुग्णांना करोनाची लागण झाली होती. तर त्यातील सुमारे 15766 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे.

श्रीरामपूर शहरात काल वॉर्ड नं. 1-01, वॉर्ड नं. 2-01, वॉर्ड नं. 7-01 व ग्रामीण भागात ऐनतपूर-01, उक्कलगाव-01, शिरसगाव-01, भामाठाण-02, अशोकनगर-03 असे 11 रुग्ण आहेत. बाहेरील तालुक्यातील 08 रुगण बाधित आढळून आले आहेत.

श्रीरामपूर तालुक्यात कालची रुग्णसंख्या 17 असून शहरात 03 तर ग्रामीण भागात 08 तसेच ज्या रुग्णाचे नाव, मोबाईल नंबर व पत्ता चुकीचा आहे असा 06 रुग्ण असून श्रीरामपूर तालुक्यात असे एकूण 17 करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com