श्रीरामपूर तालुक्यात 164 अ‍ॅक्टीव्ह रुग्ण

34 करोनाबाधितांची भर; 11 रुग्णांना डिस्चार्ज
श्रीरामपूर तालुक्यात 164 अ‍ॅक्टीव्ह रुग्ण

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

श्रीरामपूर (Shrirampur) तालुक्यात काल नव्याने 34 करोनाबाधित रुग्ण (Covid 19 Positive Patient) आढळून आले आहेत. 164 रुग्ण अ‍ॅक्टीव्ह (Active) असून ते वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत. उपचार घेवून बरे झालेल्यांची संख्या काल 11 होती.

खासगी रुग्णालयात 26 तर अ‍ॅन्टीजेन तपासणीत (antigen testing) 08 असे रुग्ण आढळून आले आहेत. श्रीरामपूर (Shrirampur) तालुक्यात गेल्या काही दिवसांत सुमारे 15877 रुग्णांना करोनाची लागण झाली होती. तर त्यातील सुमारे 15738 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. श्रीरामपूर शहरात काल वॉर्ड नं. 1-05, वॉर्ड नं. 7-07 असे 12 तर ग्रामीण भागात वळदगाव-02, शिरसगाव-03, जाफराबाद-02, माळवाडगाव-01, भामाठाण-04, वडाळा महादेव-01, अशोकनगर-02, असे 15 रुग्ण आहेत. बाहेरील तालुक्यातील 07 रुगण बाधित आढळून आले आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com