श्रीरामपूर तालुक्यात 141 अ‍ॅक्टीव्ह रुग्ण

श्रीरामपूर तालुक्यात 141 अ‍ॅक्टीव्ह रुग्ण

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

श्रीरामपूर (Shrirampur) तालुक्यात काल 14 करोनाबाधित रुग्ण (Covid 19 Patient) आढळून आले आहेत. 141 रुग्ण अ‍ॅक्टीव्ह (Active patient) असून ते वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत. उपचार घेवून बरे झालेल्यांची संख्या काल 22 होती. खासगी रुग्णालयात 08 तर अ‍ॅन्टीजन तपासणीत (antigen testing) 06 असे रुग्ण आढळून आले आहेत.

श्रीरामपूर (Shrirampur) तालुक्यात गेल्या काही दिवसात सुमारे 15843 रुग्णांना करोनाची लागण (Covid 19 ) झाली होती. तर त्यातील सुमारे 15727 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. श्रीरामपूर शहरात काल वॉर्ड नं. 1-02, वॉर्ड नं. 4-01 असे 03 तर ग्रामीण भागात बेलापूर-01, वळदगाव-02, माळेवाडी-02, शिरसगाव-01, भामाठाण-02, वडाळा महादेव-01, निपाणीवडगाव-01, माळेवाडी-02, असे 12 रुग्ण आहेत. बाहेरील तालुक्यातील 11 रुगण बाधित आढळून आले आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com