श्रीरामपूर तालुक्यात 185 करोनाबाधित

61 जणांना डिस्चार्ज; 1487 रुग्ण अ‍ॅक्टीव्ह रुग्ण
श्रीरामपूर तालुक्यात 185 करोनाबाधित
करोना

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

श्रीरामपूर तालुक्यात काल तालुक्यात नवीन 185 करोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. आता 1487 रुग्ण अ‍ॅक्टीव्ह असून ते वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत. उपचार घेवून बरे झालेल्यांची संख्या काल 61 होती.

जिल्हा रुग्णालयात 03 खासगी रुग्णालयात 117 तर अ‍ॅन्टीजन तपासणीत 61 असे रुग्ण आढळून आले आहेत. श्रीरामपूर तालुक्यात गेल्या काही दिवसात सुमारे 13048 रुग्णांना करोनाची लागण झाली होती. तर त्यातील सुमारे 11363 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे.

काल शहरातील वॉर्ड नं. 1-18, वॉर्ड नं. 2-03, वॉर्ड नं. 3-03 वॉर्ड नं. 4-02, वॉर्ड नं. 5-01, वॉर्ड नं. 6-06 तर वॉर्ड नं. 7-23 असे शहरात 56 रुग्ण आहेत. तर ग्रामीण भागात बेलापूर बुद्रुक-07, ऐनतपूर-03, एकलहरे-01, उक्कलगाव-04, गळनिंब-01, फत्याबाद-01, कडीत बुदुक-02, पढेगाव-06, मालुंजा-04, लाडगाव-01, कान्हेगाव-01, भेर्डापूर-04, कारेगाव-08, मातापूर-02, उंबरगाव-02, वळदगाव-0., टाकळीभान-12, भोकर-02, गुजरवाडी-01, उंदिरगाव-02, ब्राम्हणगाव-03, माळेवाडी-04, गोवर्धन-01, महांकाळवाडगाव-01, निमगाव खैरी-04, गोंधवणी-11, दत्तनगर-05, शिरगाव-04, ज़ाफराबाद-01, गोंडेगाव-02, माळवाडगाव-02, वडाळा महादेव-03, निपाणीवडगाव-04, अशोकनगर-10, असे 123 करोनाबाधित रुग्ण आहेत.

शहरात एकूण 56 ग्रामीण 123 तर अन्य तालुक्यातील तसेच ज्यांचे मोबाईल नंबर व नावे चुकीचे आहेत असे 06 रुग्ण असून असे एकूण 185 करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत.

आज लसीकरण बंद

ग्रामीण रुग्णालय श्रीरामपूर अंतर्गत असणार्‍या श्रीरामपूर येथील आगाशे हॉल, आझाद मैदान लसीकरण केंद्रावर येथे आज शुक्रवार दि. 21 मे 2021 रोजी लसीकरण बंद राहील, अशी माहिती ग्रामीण रुग्णालयाचे प्रभारी अधिक्षक डॉ. योगेश बंड यांनी दिली.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com