श्रीरामपूर शहरात अवघा एक करोना रुग्ण

ग्रामीण भागात 5 रुग्ण; 16 डिस्चार्ज तर 47 अ‍ॅक्टीव्ह रुग्ण
श्रीरामपूर शहरात अवघा एक करोना रुग्ण

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

श्रीरामपूर तालुक्यात (Shrirampur Taluka) काल 06 करोनाबाधित रुग्ण (Covid 19 Positive Patient) आढळून आले आहेत. तर 16 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. 47 करोनाचे अ‍ॅक्टीव्ह रुग्ण (Active Patient) उपचार घेत आहेत. तर या दीड वर्षात श्रीरामपूर शहरातील (Shrirampur City) सर्वात कमी निच्चांकी आकडेवारी असून अवघा एकच रुग्ण आढळून आल्याने शहरातून करोना (Covid 19) नाहीसा झाल्याचे चित्र आहे.

काल जिल्हा रुग्णालयात -00, खासगी प्रयोगशाळेत 2तर अ‍ॅन्टीजन तपासणीत (Antigen Testing) 04 असे 6 रुग्ण आढळून आले आहेत. श्रीरामपूर तालुक्यात (Shrirampur Taluka) गेल्या काही दिवसात सुमारे 17609 रुग्णांना करोनाची लागण (Covid 19) झाली होती. तर त्यातील सुमारे 17560 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे.

श्रीरामपूर शहरात 1 तर ग्रामीण भागात 5 व असे एकूण 6 रुग्ण आढळून आले आहेत. शहरी भागात एक़च असून ग्रामीण भागात बेलापूर खुर्द -1, कारेगाव-3, पढेगाव-1, असे 5, एकूण असे एकूण 6 करोना बाधित रुग्ण तालुक्यात आढळून आले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com