श्रीरामपूर तालुक्यात 220 अ‍ॅक्टीव्ह रुग्ण

24 करोनाबाधित; 30 रुग्णांना डिस्चार्ज
करोना
करोना

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

श्रीरामपूर तालुक्यात आज 24 करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. आज 220 रुग्ण अ‍ॅक्टीव्ह असून ते वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत. उपचार घेवून बरे झालेल्यांची संख्या काल 30 होती.

जिल्हा रुग्णालयात 00 खासगी रुग्णालयात 18 तर अ‍ॅन्टीजन तपासणीत 06 असे रुग्ण आढळून आले आहेत. श्रीरामपूर तालुक्यात गेल्या काही दिवसात सुमारे 15453 रुग्णांना करोनाची लागण झाली होती. तर त्यातील सुमारे 14689 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे.

शहरात- वॉर्ड नं. 7-06 असे 06 तर ग्रामीण भागात बेलापूर-02, उक्कलगाव-01, पढेगाव-02, उंबरगाव-01, गुजरवाडी-01, माळेवाडी-01, गोंधवणी-02, दत्तनगर-02, मुठेवाडगाव-01, अशोकनगर-01 असे एकूण 14 रुग्ण आढळून आले आहेत.

काल शहरात 06 करोनाबाधित रुग्ण तर ग्रामीण भागात 14 रुग्ण असे 20 रुग्ण आढळून आले. यात अन्य तालुक्यातील तसेच मोबाईल नंबर चुकलेले तसेच चुकीचे नाव दिलेले असे 04 रुग्ण असून असे एकूण 24 रुग्ण आढळून आले आहेत.

लसीकरणात नगरसेवक, पालिका कर्मचार्‍यांचा हस्तक्षेप

ग्रामीण रुग्णालय श्रीरामपूर अंतर्गत असणारे आगाशे हॉल, आझाद मैदान लसीकरण केंद्र, श्रीरामपूर येथे सुरु करण्यात आले आहे. मात्र पालिकेकडून ज्या नागरिकांना फोन करुन लसीकरणासाठी बोलावले जाते. हे नागरीक रांगेत ताटकळत बसतात. मात्र या दरम्यान काही नगरसेवक व पालिकेचे कर्मचारी अधिकारी आपल्या ओळखीच्या लोकांना सरळ लसीकरण केंद्रात जावून लसीकरण करुन घेतात. ज्यांची नावे दिलेल्या यादीतही नसते. ज्यांची मुदत संपलेली नसतानाही त्यांचे लसीकरण करुन घेतले जाते. काही फ्रंटलाईन वर्करच्या नावानेही लसीकरण करुन घेतात. यामुळे यादीप्रमाणे ज्या लोकांंना बोलावले जाते त्यांना ताटकळत का ठेवले जातेे? त्यांना बोलावूच नका? अगोदर ज्यांचे वशिल्याचे लोक आहेत त्यांचे लसीकरण करुन घ्या, असे संतप्त प्रश्न नागरिकांनी करत या व्यवस्थानाच्या विरोधात संताप केला जात आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com