श्रीरामपूर तालुक्यात 169 रुग्ण अ‍ॅक्टीव्ह

12 रुग्ण करोनाबाधित; 16 रुग्णांना डिस्चार्ज
श्रीरामपूर तालुक्यात 169 रुग्ण अ‍ॅक्टीव्ह

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

श्रीरामपूर (Shrirampur) तालुक्यात काल केवळ 12 करोनाबाधित रुग्ण (Covid 19 Patient) आढळून आले आहेत. काल 169 रुग्ण अ‍ॅक्टीव्ह (Active Patient) असून ते वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत. उपचार घेवून बरे झालेल्यांची संख्या काल 16 होती. ग्रामीण भागात तीन रुग्ण आढळल्याने ग्रामीण भागात दिलासा मिळाला आहे.

जिल्हा रुग्णालयात 03, खासगी रुग्णालयात 02 तर अ‍ॅन्टीजन तपासणीत 07 असे रुग्ण आढळून आले आहेत. श्रीरामपूर तालुक्यात गेल्या काही दिवसात सुमारे 15765 रुग्णांना करोनाची लागण झाली होती. तर त्यातील सुमारे 15621 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे.

श्रीरामपूर शहरात काल वॉर्ड नं. 6 -04, वॉर्ड नं. 7-01 असे 05 तर ग्रामीण भागात बेलापूर-01, निपाणीवाडगाव-02, खानापूर- 01 शिरसगाव-01, व प्रगतीनगर- 01 असे 06 रुग्ण आहेत. बाहेरील तालुक्यातील 01 रुगण बाधित आढळून आला आहे.

श्रीरामपूर तालुक्यात कालची रुग्णसंख्या 12 असून शहरात 05 तर ग्रामीण भागात 06 तसेच ज्या रुग्णाचे नाव, मोबाईल नंबर व पत्ता चुकीचा आहे असा 01 रुग्ण असून श्रीरामपूर तालुक्यात असे एकूण 12 करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com