श्रीरामपूर तालुक्यात काल 158 रुग्णांना डिस्चार्ज

104 करोनाबाधित रुग्ण; 956 रुग्ण अ‍ॅक्टीव्ह
श्रीरामपूर तालुक्यात काल 158 रुग्णांना डिस्चार्ज

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

श्रीरामपूर तालुक्यात काल 104 करोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. मात्र बरे होवून घरी जाणार्‍यांची संख्या काल 158 असल्याने बरे होण्याचे प्रमाण खूपच जास्त आहे.

काल 104 रुग्ण सापडले आहे. तर 956 रुग्ण अ‍ॅक्टीव्ह असून ते वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत. काल 158 रुग्ण बरे होवू न घरी गेले आहेत.

जिल्हा रुग्णालयात 29 खासगी रुग्णालयात 69 तर अ‍ॅन्टीजन तपासणीत 06 असे रुग्ण आढळून आले आहेत. यात काल 158 जणांना बरे वाटले म्हणून घरी सोडण्यात आले आहे. श्रीरामपूर तालुक्यात एकूण 956 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. श्रीरामपूर तालुक्यात गेल्या काही दिवसात सुमारे 6664 रुग्णांना करोनाची लागण झाली होती. तर त्यातील सुमारे 4632 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहेत. तर सध्या एकूण अंदाजे 956 रुग्ण विविध कोविड सेंटरमध्ये उपचार घेत आहेत.

यात श्रीरामपूर शहरात 18 तर ग्रामीण भागात 60 रुग्ण असे 78 तर 26 रुग्ण अन्य तालुक्यातील तसेच पूर्ण नाव नसलेले व मोबाईल नंबर चुकीचा दिलेले रुग्ण असून असे 104 रुग्ण आहेत.

शहरात वॉर्ड नं. 1-02, वॉर्ड नं. 3-02, वॉर्ड नं. 4-01, वॉर्ड नं. 6-03, वॉर्ड नं. 7-10 असे 18 तर ग्रामीण भागात मुठेवाडगाव-01, दत्तनगर-06, बेलापूर-06, भोकर-05, एकलहरे-04, शिरसगाव-04, कारेगाव-02, खंडाळा-06, निमगावखैरी-03, खिर्डी-01, मातापूर-01, पढेगाव-03, ऐनतपूर-01, टाकळीभान-02, उक्कलगाव-04, निपाणीवडगाव-02, गोंडेगाव-04, उंदिरगाव-01, गोंधवणी-01, माळेवाडी-01, लाडगाव-01, ब्राम्हणगाववेताग़-01 असे एकूण 60 रुग्ण आढळून आले आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com