श्रीरामपूर तालुक्यात 166 नवीन रुग्ण

103 करोनाबाधित बरे होऊन घरी परतले
श्रीरामपूर तालुक्यात 166 नवीन रुग्ण

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

श्रीरामपूर तालुक्यात काल पुन्हा दिलासा मिळाला असून तालुक्यात नवीन 166 करोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. 1467 रुग्ण अ‍ॅक्टीव्ह असून ते वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत. 103 जणांनी करोनावर मात केल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. जिल्हा रुग्णालयात 30 खासगी रुग्णालयात 99 तर अ‍ॅन्टीजेन तपासणीत 37 असे रुग्ण आढळून आले आहेत. श्रीरामपूर तालुक्यात गेल्या काही दिवसात सुमारे 8166 रुग्णांना करोनाची लागण झाली होती. तर त्यातील सुमारे 5623 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे.

श्रीरामपूर शहरात 64 तर ग्रामीण भागात 81 असे 145 रुग्ण आहेत. तर अन्य तालुक्यातील तसेच ज्यांचे मोबाईल नंबर व नावे चुकीचे आहेत असे 22 रुग्ण असून असे एकूण 166 करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. शहरातील वॉर्ड नं. 1-07, वॉर्ड नं. 2-05, वॉर्ड नं. 3-01, वॉर्ड नं. 4-02, वॉर्ड नं. 5-01, वॉर्ड नं. 6-11 तर वॉर्ड नं. 7-37 असे शहरात 64 तर ग्रामीण भागात बेलापूर बुद्रुक-06, नरसाळी-01, उक्कलगाव-04, गळनिंब-02, कुरणपूर-05, कडीत बुद्रुक-02, पढेगाव-08, मालुंजा-04, कारेगाव-05, मातापूर-01, उंबरगाव-08, वळदगाव-01, टाकळीभान-06, भोकर-02, ब्राम्हणगाव-02, हरेगाव-03, माळेवाडी-01, सराला-01, निमगाव खैरी-02, दिघी-01, गोंधवणी-01, शिरसगाव-04, माळवाडगाव-01, खोकर-02, वडाळा महादेव-03, निपाणीवडगाव-03, अशोकनगर-02 असे 81 करोनाबाधित रुग्ण आहेत. तर अन्य तालुक्यातील तसेच ज्यांचे मोबाईल नंबर व नावे चुकीचे आहेत असे 22 रुग्ण असून असे एकूण 166 करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com