श्रीरामपूर तालुक्यात 653 अ‍ॅक्टीव्ह रुग्ण

33 करोनाबाधितांची भर; 17 रुग्णांना डिस्चार्ज
श्रीरामपूर तालुक्यात 653 अ‍ॅक्टीव्ह रुग्ण

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

श्रीरामपूर तालुक्यात काल 33 करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. काल 653 रुग्ण अ‍ॅक्टीव्ह असून ते वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत. उपचार घेऊन बरे झालेल्यांची संख्या काल 17 होती.

जिल्हा रुग्णालयात 00, खासगी रुग्णालयात 18 तर अ‍ॅन्टीजेन तपासणीत 15 असे रुग्ण आढळून आले आहेत. श्रीरामपूर तालुक्यात गेल्या काही दिवसांत सुमारे 15338 रुग्णांना करोनाची लागण झाली होती. तर त्यातील सुमारे 14545 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे.

शहरात- वॉर्ड नं. 1- 01, वॉर्ड नं. 2-01, वॉर्ड नं. 7-03 असे 05 तर ग्रामीण भागात उंबरगाव-03, टाकळीभान-01, उंदिरगाव-01, हरेगाव-01, दिघी-01, गोंधवणी-01, शिरसगाव-01, नाऊर-02, खोकर-01, असे एकूण 12 रुग्ण आढळून आले आहेत.

काल शहरात 05 करोनाबाधित रुग्ण तर ग्रामीण भागात 12 रुग्ण असे 17 रुग्ण आढळून आले. यात अन्य तालुक्यातील तसेच मोबाईल नंबर चुकलेले तसेच चुकीचे नाव दिलेले असे 16 रुग्ण असून असे एकूण 33 रुग्ण आढळून आले आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com