श्रीरामपूर तालुक्यातील 111 रुग्णांना डिस्चार्ज

116 नवीन करोनाबाधित ; 961 रुग्ण अ‍ॅक्टीव्ह
श्रीरामपूर तालुक्यातील 111 रुग्णांना डिस्चार्ज

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

श्रीरामपूर तालुक्यात काल 116 करोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर 111 जणांनी करोनावर मात केल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे.

काल 116 रुग्ण सापडले आहे. तर 961 रुग्ण अ‍ॅक्टीव्ह असून ते वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत. काल आढळलेल्या करोनाबाधितांमध्ये जिल्हा रुग्णालयात 46 खासगी रुग्णालयात 60 तर अ‍ॅन्टीजन तपासणीत 10 रुग्णाचा समावेश आहे.

श्रीरामपूर तालुक्यात गेल्या काही दिवसात सुमारे 6780 रुग्णांना करोनाची लागण झाली होती. तर त्यातील सुमारे 4743 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहेत. तर सध्या एकूण अंदाजे 961 रुग्ण विविध कोविड सेंटरमध्ये उपचार घेत आहेत.

श्रीरामपूर शहरात 33 तर ग्रामीण भागात 81 रुग्ण असे 78 तर 2 रुग्ण अन्य तालुक्यातील तसेच पूर्ण नाव नसलेले व मोबाईल नंबर चुकीचा दिलेले रुग्ण असून असे 116 रुग्ण आहेत.

शहरात वॉर्ड नं. 1-14, वॉर्ड नं. 4-02, वॉर्ड नं. 5-01, वॉर्ड नं. 6-03, वॉर्ड नं. 7-13 असे 33 तर ग्रामीण भागात बेलापूर-09, उक्कलगाव-05, गळनिंब-02, फत्याबाद-01, कडीत बुद्रुक-01, पढेगाव-02, कान्हेगाव-01, भेर्डापूर-04, कारेगाव-02, मातापूर-02, वळदगाव-01, टाकळीभान-04, खिर्डी-01, वांगी बुद्रुक-01, उंदिरगाव-06, ब्राम्हणगाव-02, गोवर्धन-02, महांकाळवाडगाव-02,निमगाव खैरी-05, गोंधवणी-01, दत्तनगर-02, खंडाळा-05, शिरसगाव-05, माळवाडगाव-01, मुठेवाडगाव-05, वडाळा महादेव-03, निपाणीवडगाव-01, अशोकनगर-03 असे एकूण 81 रुग्ण आढळून आले आहेत. 2 रुग्ण अन्य तालुक्यातील तसेच पूर्ण नाव नसलेले व मोबाईल नंबर चुकीचा दिलेले रुग्ण आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com