श्रीरामपूर तालुक्यात काल पुन्हा करोनाने डोके वर काढले

297 करोनाबाधित रुग्ण; 138 रुग्ण बरे होऊन घरी गेले
श्रीरामपूर तालुक्यात काल पुन्हा करोनाने डोके वर काढले

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

श्रीरामपूर तालुक्यात काल पुन्हा करोनाने डोके वर काढले असून काल तालुक्यात 297 करोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. मात्र बरे होवून घरी जाणार्‍यांची संख्या काल 138 असल्याने बरे होण्याचे प्रमाण खूपच जास्त आहे.

काल 297 रुग्ण सापडले आहे. तर 1120 रुग्ण अ‍ॅक्टीव्ह असून ते वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत. काल 138 रुग्ण बरे होवू न घरी गेले आहेत.

जिल्हा रुग्णालयात 22 खासगी रुग्णालयात 254 तर अ‍ॅन्टीजन तपासणीत 21 असे रुग्ण आढळून आले आहेत. यात काल 138 जणांना बरे वाटले म्हणून घरी सोडण्यात आले आहे. श्रीरामपूर तालुक्यात एकूण 1120 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. श्रीरामपूर तालुक्यात गेल्या काही दिवसात सुमारे 7077 रुग्णांना करोनाची लागण झाली होती. तर त्यातील सुमारे 4881 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहेत. तर सध्या एकूण अंदाजे 1120 रुग्ण विविध कोविड सेंटरमध्ये उपचार घेत आहेत.

यात श्रीरामपूर शहरात 124 तर ग्रामीण भागात 137 रुग्ण असे 261 तर 36 रुग्ण अन्य तालुक्यातील तसेच पूर्ण नाव नसलेले व मोबाईल नंबर चुकीचा दिलेले रुग्ण असून असे 297 रुग्ण आहेत.

शहरात वॉर्ड नं. 1-28, वॉर्ड नं. 2-07, वॉर्ड नं. 3-06 वॉर्ड नं. 5-10, वॉर्ड नं. 6-14, वॉर्ड नं. 7-59 असे 124 तर ग्रामीण भागात बेलापूर बुद्रुक -13, ऐनतपूर-01, बेलापूर खुर्द (नरसाळी) -02, उक्कलगाव-04,कुरणपूर-02, फत्याबाद-02, पढेगाव-06, भेर्डापूर-05, कारेगाव-04, मातापूर-02, उंबरगाव-02, वळदगाव-01, टाकळीभान-02 भोकर - 08, ब्राम्हणगाव-03 हरेगाव -06, माळेवाडी-01, महांकाळवाडगाव-06,निमगाव खैरी -02, दिघी-03, गोंधवणी -06, दत्तनगर-07, खंडाळा-04, शिरसगाव-10, गोंडेगाव-04, माळवाडगाव-03, भामाठाण-03, खोकर-05, मुठेवाडगाव-02, वडाळा महादेव-08,निपाणीवडगाव-06, अशोकनगर-02 रुग्ण असे 137 आढळून आले आहेत. 36 रुग्ण अन्य तालुक्यातील तसेच पूर्ण नाव नसलेले व मोबाईल नंबर चुकीचा दिलेले रुग्ण असून असे 116 रुग्ण आहेत. गेल्याकाही दिवसानंतर काल पुन्हा करोनाने तालुक्यात डोके वर काढले आहे. लॉकडाऊनच्या काळातही करोना रुग्ण संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ होत असल्यामुळे नागरिकांनी चिंता व्यक्तकेली आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com