श्रीरामपूर तालुक्यात 168 करोनाबाधित रुग्ण

164 जणांना डिस्चार्ज; 1538 रुग्ण अ‍ॅक्टीव्ह
श्रीरामपूर तालुक्यात 168 करोनाबाधित रुग्ण

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

श्रीरामपूर तालुक्यात काल तालुक्यात 168 करोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. 1538 रुग्ण अ‍ॅक्टीव्ह असून ते वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत. उपचार घेवून बरे झालेल्यांची संख्या काल 164 होती.

जिल्हा रुग्णालयात 05 खासगी रुग्णालयात 104 तर अ‍ॅन्टीजन तपासणीत 59 असे रुग्ण आढळून आले आहेत. श्रीरामपूर तालुक्यात गेल्या काही दिवसात सुमारे 12458 रुग्णांना करोनाची लागण झाली होती. तर त्यातील सुमारे 10801 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे.

काल शहरातील वॉर्ड नं. 1-12, वॉर्ड नं. 2-03 वॉर्ड नं. 3-04, वॉर्ड नं. 4-01, वॉर्ड नं. 5-01, वॉर्ड नं. 6-02 तर वॉर्ड नं. 7-17 असे शहरात 40 तर ग्रामीण भागात बेलापूर बुद्रुक-08, ऐनतपूर-02, एकलहरे-01, उक्कलगाव-02, गळनिंब-05, मांडवे-01 कडीत बुद्रुक-01, पढेगाव-11, मालुंजा-02, भेर्डापूर-03, कारेगाव-02, उंबरगाव-02, टाकळीभान-05, भोकर-01, घुमनदेव-01, वांगी बुद्रुक-02, उंदिरगाव-13, ब्राम्हणगाव-03, माळेवाडी-10, महांकाळवाडगाव-01, गोंधवणी-01, दत्तनगर-03, खंडाळा-03, शिरसगाव-15, नाऊर-05, गोंडेगाव-03, मातुलठाण-02, माळवाडगाव-06, खोकर-01, मुठेवाडगाव-01, अशोकनगर-01, असे 117 करोनाबाधित रुग्ण आहेत.

शहरात एकूण 40, ग्रामीण 117 तर अन्य तालुक्यातील तसेच ज्यांचे मोबाईल नंबर व नावे चुकीचे आहेत असे 11 रुग्ण असून असे एकूण 391 करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत.

आज लसीकरण बंद

ग्रामीण रुग्णालय श्रीरामपूर अंतर्गत असणार्‍या श्रीरामपूर येथील आगाशे हॉल, आझाद मैदान लसीकरण केंद्रावर येथे आज सोमवार दि. 17 मे 2021 रोजी लसीकरण बंद राहील. त्यामुळे नागरिकांनी आपापल्या घरीच थांबावे. विचारपूस करण्यास लसीकरण केंद्रावर जावू नये. पुढील नियोजित लसीकरण सत्राची माहिती व्हाटसअप ग्रुपवर देण्यात येईल, अशी माहिती ग्रामीण रुग्णालयाचे प्रभारी अधिक्षक डॉ. योगेश बंड यांनी दिली.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com