श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

श्रीरामपूर तालुक्यात काल उच्चांकी 116 रुग्ण सापडले आहेत. तर 431 रुग्ण अॅक्टिव्ह असून ते वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत.

तालुक्यात 116 रुग्ण काल आढळून आले असले तरी काल 69 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.

श्रीरामपूर तालुक्यात काल 116 करोना बाधित रुग्ण सापडले आहेत. जिल्हा रुग्णालयात 49, खासगी रुग्णालयात 44 तर अॅन्टीजेन तपासणीत 23 असे रुग्ण आढळून आले आहेत. यात काल 69 जणांना बरे वाटले म्हणून घरी सोडण्यात आले आहे.

श्रीरामपूर तालुक्यात एकूण 431 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. श्रीरामपूर तालुक्यात गेल्या काही दिवसात सुमारे 1019 रुग्णांना करोनाची लागण झाली होती. तर त्यातील सुमारे 486 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. तर सध्या एकूण अंदाजे 431 रुग्ण विविध कोव्हिड सेंटरमध्ये उपचार घेत आहेत.

शहरात - 62, ग्रामीण भाग- 47, बाहेरील तालुका -1 असे एकूण - 78 रुग्ण आहेत. यात बेलापूर 03, बेलापूर खु.02, उक्कलगाव-01, उंबरगाव-04, मालुंजा-01, कुरणपूर-01, फत्त्याबाद (मांडवे)-01, कान्हेगाव-03, निमगाव खैरी 08, दत्तनगर-01, गोंडेगाव-02, मातुलठाण-01, सरालाबेट-01, नायगाव-01, उंदिरगाव-01, टाकळीभान 04, माळेवाडी-01, खानापूर-01, अशोकनगर-04, गोंधवणी 03 असे 47 रुग्ण आहेत.

तर श्रीरामपुरात 11, वॉर्ड नंबर-1-10, वॉर्ड नंबर-2- 03, वॉर्ड नंबर-3-1, वॉर्ड नंबर-5-02, वॉर्ड नंबर- -6-02, वॉर्ड नंबर-7-17 असे 62 रुग्ण आढळून आले आहेत. तर बाहेरील तालुक्यातील 7 असे काल एकूण 116 रुग्ण आढळून आले आहेत.

काळजी घ्या; गर्दी करू नका - पाटील

काल श्रीरामपूर तालुक्यात उच्चांकी असे 116 करोना बाधित रुग्ण आढळून आल्याने श्रीरामपूर तालुक्याची चिंता वाढली आहे. त्यामुळे जिल्ह्यात पहिल्या पाच तालुक्यांत श्रीरामपूरचा तिसरा नंबर लागला आहे. त्यामुळे तालुक्यातील प्रत्येक गावात तसेच शहरामध्ये नागरिकांनी गर्दी न करता काळजी व करोनाचा हा आकडा कमी कसा होईल यासाठी प्रयत्न करा, असे आवाहन तहसीलदार प्रशांत पाटील यांनी केले आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर रुग्ण संख्या वाढणे म्हणजे चिंतेचा विषय ठरला आहे. तरी सर्व नागरिकांनी करोना काळात शासनाने घालून दिलेले नियम पाळावेत, असे आवाहनही त्यांनी केले.